---Advertisement---

IPL 2027 मध्ये मुंबई नाही, तर या संघाकडून खेळणार हार्दिक पांड्या? ट्रेड डील अंतिम टप्प्यात!

On: शुक्रवार, जुलै 31, 2026 11:11 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आता भविष्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच व्यवस्थापन काही मोठे निर्णय घेताना दिसत आहे. यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik pandya) ट्रेड करण्याच्याही चर्चा सुरू आहेत. पांड्या संघात आल्यापासूनच ड्रेसिंग रूममध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याच्या चर्चा समोर येत होत्या.

आता व्यवस्थापनाने हार्दिक पांड्यापासून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणामुळेच त्याची काही संघांशी बोलणी सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, एका संघासोबत त्याचा करार अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.

रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्स (CSK& MI) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळाडूंची अदलाबदल (Trade) करण्याच्या चर्चा सुरू आहेत. यानुसार मुंबई इंडियन्सचा संघ पांड्याच्या मोबदल्यात 3 खेळाडूंची मागणी करत होता. यामध्ये शिवम दुबे, खलील अहमद आणि अंशुल कंबोज यांच्या नावांचा समावेश होता.

मात्र, रिपोर्ट्सनुसार 2 खेळाडूंसंदर्भातील बोलणी जवळपास पूर्ण झाली आहे. हार्दिक पांड्याचं सीएसके (CSK) म्हणजेच चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर दुसरीकडे, अंशुल कंबोज (Anshul kamboj & Shivam Dube) आणि शिवम दुबे मुंबई इंडियन्समध्ये येऊ शकतात. यामुळे मुंबई संघाच्या 2 मोठ्या समस्या दूर होऊ शकतात.

मुंबई संघाला एका चांगल्या वेगवान गोलंदाजाची गरज आहे, जी गरज कंबोज पूर्ण करू शकतो. आता हार्दिक मुंबईची साथ सोडून दुसऱ्या संघात कधी प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---