भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्याने आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल खुलासा केला आहे. त्याने आवडता क्रिकेटपटू म्हणून माजी भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर याचे नाव घेतले आहे. यामागचे कारणही त्याने सांगितले आहे.
नुकतेच इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) हार्दिकच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजराज टायटन्सने (Gujarat Titans) विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे हा गुजरात संघाचा पहिलाच आयपीएल हंगाम होता. हार्दिक अंतिम सामन्यात सामनावीरही ठरला. त्यामुळे सध्या हार्दिकचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तसेच हार्दिकला आयपीएल २०२२ मधील कामगिरीमुळे भारतीय संघात पुनरागमन करण्यातही यश मिळाले आहे. त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
दरम्यान, त्याने एसजी पॉडकास्टमध्ये बोलताना जाफर (Wasim Jaffer) त्याचा आवडता खेळाडू (Fovourite Cricketer) असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘सर्वांप्रमाणेच, मलाही काही क्रिकेटपटू आवडतात. मला जॅक कॅलिस, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आवडतात. अनेक महान खेळाडू आहेत, ज्यांच्यापैकी एकाला निवडणे कठीण आहे. पण खरंतर माझा आवडता खेळाडू वासिम जाफर आहे. मी त्याला फलंदाजी करताना पाहायचो. तो असा खेळाडू होता, ज्याला मी अन्य दिग्गजांपेक्षा वर ठेवले. मी त्याच्या फलंदाजीची नक्कल करण्याचाही प्रयत्न करायचो, पण मी कधीच्या त्याच्या दर्जापर्यंत पोहचू शकलो नाही.’
जाफर फार काळ भारतीय संघासाठी खेळला नसला, तरी त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी अफलातून राहिली आहे. जाफरने भारताकडूनही २००० ते २००८च्या दरम्यान ३१ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी त्याने ५ शतके आणि ११ अर्धशतके ठोकत १९४४ धावा केल्या. तसेच त्याने २ वनडे सामनेही खेळले आहेत.
याशिवाय त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी शानदार राहिली असून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २६० सामने खेळताना ५०.६७ च्या सरासरीने १९४१० धावा केल्या आहेत. यात ५७ शतकांचा आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १२०३८ त्याने केवळ रणजी ट्रॉफीत खेळतानाच केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळणार संधी? प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे महत्वाचे संकेत
काय सांगता! भारत कधीही मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकला नाही टी२० मालिका, पाहा आकडेवारी
पुरुष नाही महिला क्रिकेटपटूंनी रचला होता इतिहास, वनडे सामन्यात ठोकलेल्या ४९१ धावा