भारताने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात झालेल्या टी२० मालिकेतील तीन सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली आहे. तर उर्वरित दोन सामने फ्लोरिडा, अमेरिका येथे खेळले जाणार आहेत. भारताने तिसरा सामना जिंकल्यानंतर अष्टपेलू हार्दिक पांड्याने जबाबदाऱ्या असल्या तर विचारक्षमता वाढते. त्याचबरोबर त्याचा खेळ उत्तम होतो, असे विधान केले आहे.
तिसऱ्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने धमाकेदार अर्धशतक केले. तसेच त्याने श्रेयस अय्यर याच्यासोबत भागीदारी केली. हा सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बोलत होता. त्याने म्हटले, “संघाचा उपकर्णधार होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. रोहित मला खूप मदत करतो, त्याने कर्णधार म्हणून चांगली जबाबदारी पार पाडली आहे. त्याने आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांनी संघाला एकत्र आणले आहे.”
“त्याच्यासोबत खेळाडू स्वतला सुरक्षित समजतात. मी नेहमी जबाबदारींचा आनंद घेतला आहे. जेव्हा पण मी कोणतीही जबाबदारी घेतली आहे तेव्हा माझ्या खेळामध्ये सकारात्मक आणि नवीन बदल घडून आले आहेत. जबाबदाऱ्या मला अधिक विचार करायला परावृत्त करते. जेणेकरून माझ्या क्रिकेट खेळण्याला एक चांगले वळण प्राप्त झाले आहे,” असेही हार्दिकने पुढे म्हटले आहे.
“भारतासाठी हा सामना जिंकणे महत्वाचे होते. सूर्यकुमार यादव एक जबरदस्त खेळाडू आहे. तो अप्रतिम शॉट्स खेळण्यात पारंगत आहे. आम्ही जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा आम्हाला खेळपट्टीचा अंदाज आला, त्यावरून सूर्यकुमारची फलंदाजी विशेष आहे. त्याने कठोर मेहनत केली असून त्याला मिळालेल्या संधीचा त्याने सामनाविजयाची भुमिका निभावत पुरेपूर फायदा घेतला आहे.” तसेच हार्दिकने रोहितने कसा आक्रमकपणे आणि खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्याचा वाव दिला आहे, याबाबतीह आपले मत मांडले आहे.
हार्दिकने पुढे त्याच्या गोलंदाजीने संघाला कशी मदत होत आहेत, याबद्दलही काही मत मांडले आहे. त्याने म्हटले, “गोलंदाजी करताना मला एक संतुलन प्राप्त होते. जे संघासाठी लाभदायक ठरत आहे. यासाठी मला माझ्या गोलंदाजीत अजून सुधारणा करत कोणत्याही चुका कराव्या लागणार नाही. संघासाठी तिसऱ्या किंवा चौथ्या वेगवान गोलंदाजाची भुमिका तसेच फलंदाजीतही चांगली कामगिरी करताना मला आनंद होत आहे.”
या २८ वर्षीय खेळाडूने नुकतेच इंग्लंड दौऱ्यात आपले आंतरराष्ट्रीय टी२०मधील अर्धशतक झळकावले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद! आरपी सिंगच्या मुलाची इंग्लंड अंडर-१९ संघात निवड
वहिनी नसताना तुझी बॅट चांगलीच चालते..! जेव्हा लाईव्ह मुलाखतीत इशानने सूर्यकुमारची घेतली फिरकी
आशिया चषकात भारतीय संघाला ‘या’ चौघांची कमतरता जाणवणार! २०१८ साली जिंकवून दिलेली ट्रॉफी