भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात गुरूवारी (5 जानेवारी) झालेला मालिकेतील दुसरा टी20 सामना नो-बॉलमुळे चर्चेत आला आहे. यामध्ये भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने तब्बल 5 नो-बॉल टाकले. अतिरिक्त धावांबाबत पाहिले तर भारताने श्रीलंकेला 7 फ्री हीट,4 वाईड आणि एक लेग बाय दिले. याचा पूर्ण फायदा उचलत श्रीलंकेने धावफलकावर 206 धावा जोडल्या. ज्यामुळे भारताचे पुढे नुकसान झाले.
भारत जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करत होता तेव्हा संघाची स्थिती 57 धावसंख्येवर 5 विकेट्स अशी झाली होती. नंतर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला विजयाच्या जवळ नेले. शेवटच्या दोन षटकात एकीकडे श्रीलंका श्वास रोखून होता, कारण अक्षरने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला होता. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 21 धावांची आवश्यकता होती आणि अक्षर खेळपट्टीवर होता.यामुळे भारत जिंकणार असे वाटत असताना तो बाद झाला.
सामन्यात भारताला एका चेंडूत 17 धावांची आवश्यकता होती जे अशक्य होते. तेव्हा भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सामना सुरू असतानाच भारतीय खेळाडू आणि स्टाफ यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसला. सामान्यपणे खेळाडू संघसहकारी आणि विरोधी खेळाडूंसोबत सामन्याच्याशेवटी हस्तांदोलन करतात, मात्र या सामन्यात हार्दिकने एक बॉल शिल्लक असतानाच जितेश शर्मा, शुबमन गिल आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याशी हस्तांदोलन केले. त्याच्या या ऍक्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
त्या क्षणाला भारताचा विजय अशक्य होता, मात्र हार्दिकच्या वर्तवणुकीमुळे चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/CricketGirl45/status/1611048781390438402?s=20&t=vb-8msJlt3ud0BBT9DXicg
It's hardik Era, anything can happen in this era🤣💀
— Isha (@isha45___) January 6, 2023
“गोलंदाजी आणि फलंदाजीच्या पॉवरप्लेदरम्यान आम्हाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यात आम्ही अनेक छोट्या चुका केल्या. त्यामधून शिकणार असून भविष्यात त्या करणार नाहीत,” असे हार्दिकने सामन्यानंतर म्हटले. पुण्यात झालेला हा सामना भारताने 16 धावांनी गमावला. यामुळे तीन सामन्यांची टी20 मालिका एक-एक अशी बरोबरीत आली.
या मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे. (Hardik Pandya post match gestures before last ball goes viral INDvSL 2nd T20)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘नो- बॉल हा गुन्हाच…’, टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य
AUSvSA: भारताचे टेंशन वाढले! सिडनी कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या खेळावर पावसाने फेरले पाणी