भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत मालिका खिशात घातली. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात करत भारताने २०१५-२०१६ नंतर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये टी२० मालिका विजय मिळवला. या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४२ धावा ठोकणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पंड्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. मात्र, सामनावीर ठरल्यानंतर हार्दिकने अशी एक गोष्ट म्हटली, त्यामुळे त्याचा दिलदारपणा सर्वांना दिसून आला.
भारताने मिळवला टी२० मालिकेत विजय, पंड्या ठरला सामनावीर
टी२० मालिकेपूर्वी झालेल्यामालिकेपूर्वी झालेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला २-१ या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर, कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव करत, टी२० मालिकेला विजयाने आरंभ केला. त्यानंतर, रविवारी (६ डिसेंबर) सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ६ गड्यांनी पछाडले. याचबरोबर, भारत तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशा आघाडीवर आला आहे.
या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अष्टपैलू हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४२ धावांचा तडाखा देत भारताला विजयी केले. पंड्याच्या या खेळीत ३ चौकार व दोन गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. पंड्याला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर दिली ही प्रतिक्रिया
पारितोषिक वितरण समारंभात बोलताना सामनावीर पंड्या म्हणाला, “सामना जिंकल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. मात्र, ऑस्ट्रेलियाने खरंच चांगली फलंदाजी केली. यावेळी मी नटराजनचे खास कौतुक करेल. आमचे इतर गोलंदाज गोलंदाजी करताना काहीसे विचलित होत होते. परंतु, नटराजने परिपक्वता दाखवत अप्रतिम गोलंदाजी केली. मला वाटते, या सामन्याचा खरा सामनावीर तो असायला हवा.”
Hardik Pandya is all praise for @Natarajan_91 👌👌#TeamIndia | @hardikpandya7 | #AUSvIND pic.twitter.com/NX0nofFZZm
— BCCI (@BCCI) December 6, 2020
Man With Golden Heart @hardikpandya7 ❤️❤️🙏🙏
— Ugendher Goud Prince (@UgendherPrince) December 6, 2020
Well said, Natarajan also deserved Man of the Match. If it wasn't for him we could have been chasing 210+ & lost. More respect for Hardik Pandya.
— Karan Sharma (@iamkaran7) December 6, 2020
"I said at the presentation as well that T Natarajan deserved the Man Of The Match award, but it's a batsman game. Once I went to the dressing after 1st innings, I said they're 10-15 runs short and it was because of Natarajan's spell." – Hardik Pandya (Press).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2020
पंड्याच्या या दिलदारीने सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी पंड्याच्या या कृतीचे कौतुक केलेले दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…बेस्ट इन ब्ल्यू’, सामनावीर ठरलेल्या पंड्यासाठी मुंबई इंडियन्सचे खास ट्वीट
‘हिटमॅन’ने केले भारतीय संघाचे अभिनंदन, ट्वीट करत म्हणाला…
याला सातत्य असे नाव! भारतीय संघाची ‘ही’ कामगिरी पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर