---Advertisement---

हार्दिक पंड्या गात होता चक्क श्रीलंकन राष्ट्रगीत? व्हिडिओ झाला व्हायरल

On: सोमवार, जुलै 26, 2021 12:08 AM
---Advertisement---

कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. भारतीय खेळाडूंनी जबरदस्त सांघिक कामगिरी करत ३८ धावांनी सामना आपल्या नावावर केला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतादरम्यानचा हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. तसेच अनेक चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

नेमकी घडली अशी घटना
कोणत्याही द्विपक्षीय मालिकेच्या सुरुवातीला उभय संघांचे राष्ट्रगीत वाजवण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेनुसार भारत आणि श्रीलंकेचे संघ मैदानाच्या मधोमध उभे होते. प्रथमता भारतीय संघाचे राष्ट्रगीत वाजवले गेले. त्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रगीत सुरू झाले. त्याचवेळी सर्व क्रिकेट चाहत्यांना एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या हा चक्क श्रीलंकेचे राष्ट्रगीत चालू असताना तोंड हलवताना दिसला. त्याच्या तोंड हलवण्याच्या कृतीतून तो श्रीलंकेचे राष्ट्रगीत गात असल्याचे दिसून येत होते. त्याच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

फलंदाजीत अपयशी ठरला हार्दिक
हार्दिक पांड्या या सामन्यात अपयशी ठरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यानंतर तो १२ चेंडूंमध्ये केवळ १० धावा काढून माघारी परतला. तसेच क्षेत्ररक्षण करताना दुसऱ्या षटकात त्याने एक सोपा झेलदेखील सोडला‌. गोलंदाजीत मात्र त्याने एक बळी आपल्या नावे केला. टी२० मालिकेपूर्वी झालेल्या वनडे मालिकेतही तो प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता.

भारतीय संघाने मिळवला सोपा विजय
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ बाद १६४ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५० तर, कर्णधार शिखर धवनने ४६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यासमोर श्रीलंकेचा फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि त्यांना ३८ धावांनी नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंका वि. भारत: ४६ धावांची खेळी करत ‘कर्णधार’ धवन ‘या’ यादीमध्ये सेहवागला पछाडत आला पहिल्या स्थानी

‘भारतीय नारी, सर्वांवर भारी!’, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचे सेहवागकडून हटके शब्दात कौतुक

कमनशिबी शॉ! पृथ्वी ठरला पदार्पणात ‘गोल्डन डक’ होणारा दुसरा भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---