न्यूझीलंड अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात सध्या कसोटी तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ही मालिका संपल्यानंतर उभय संघात 22 सप्टेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. शुक्रवारी बीसीसीआयने या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला. अनुभवी यष्टीरक्षस संजू सॅमसन (Sanju Samson) याला या संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे. संघात एका युवा खेळाडूलाही संधी दिली गेली आहे, जो भविष्यात हार्दिक पंड्या याचा पर्यायी खेळाडू ठरू शकतो.
भारताने यावर्षी 19 वर्षाखालील टी-20 विश्वचषक जिंकला. संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी अष्टपैलू राज बाबा (Raj bawa) याने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आता त्याला भारत अ संघात संधी दिली गेली आहे. निवडकर्त्यांकडून त्याला खूपच लवकर संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. याचे कारण देखील तसेच आहे. राज बावा तुफानी फलंदाजी करू शकतोच, पण सोबतच वेगवान गोलंदाजी देखील करू शकतो. भारतीय संघाला पहिल्यापासूनच वेगवान गोलंदाजी अष्टपैलूची कमी जाणवत आली आहे. हार्दिक पंड्याच्या रूपात संघाची ही कमी भरून निघाली आहे. पण तरीदेखील संघाला अजून एका अष्टपैलूची आवश्यकता आहे, जो वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकेल.
मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खराब फॉर्मशी झगडत होता. त्याच्या या खराब प्रदर्शनाचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर देखील पडला. पंड्या मधल्या काळात विश्रांती घेऊन जरी आता पूर्णपणे फिट झाला असला, तरी संघाला त्याच्या पर्यायी खेळाडूची गरज कधीही भासू शकते. याच पार्श्वभूमीवर निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन राज बावाला तयार करण्यासाठी प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. भारताच्या 19 वर्षाखालील संघासाठी त्याचे चांमकदार कामगिरी केली असून आता भारत अ संघासाठी देखील अशाच प्रदर्शनाची अपेक्षा त्याच्याकडून आहे.
हार्दिक दुखापतीचा सामना करत असाताना निवडकर्त्यांनी त्याच्या जागी विजय शंकर आणि शिवम दुबे यांना संघात संधी दिली गेली होती. पण या दोघांनीही अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. दोघेही या भूमिकेत अपयशी ठरले होते. त्यानंतर शार्दुल ठाकुरला देखील संघाने आजमावले होते, पण तो देखील ही जबाबादारी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकला नाही. भारत अ संघासोबत आता राज बावा जर चमकदार कामगिरी करू शकला, तर भविष्यात हार्दिकचा पर्यायी खेळाडू म्हणून समोर येऊ शकतो.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघ –
पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियामध्ये एंट्री करताच ‘या’ खेळाडूने शतकी खेळी करत केला जल्लोष
गल्ली क्रिकेटशी विराटचे जवळचे नाते! सांगितला सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘या’ शब्दांचा अर्थ
आशिया चषकानंतर आता श्रीलंकेचे लक्ष्य टी20 विश्वचषकावर, संघच निवडलायं मजबूत