---Advertisement---

धक्कादायक! रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहते Out of Control, जाळून टाकली मुंबईची टोपी अन् जर्सी- Video

Rohit-Sharma-Fan-Burns-MI-Cap-And-Jersey
---Advertisement---

Rohit Sharma Fan Burns MI Jersey And Cap: इंडियन प्रीमिअर लीग अर्थातच आयपीएलचा पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ सध्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करत आहे. कारण, मुंबईने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) रोहित Mumbai Indians । नवा कर्णधार निवडला पण फ्रँचायझीसाठी रोहित अमूल्य! खास व्हिडिओतून दिला ट्रिब्यूटशर्मा याला कर्णधारपदावरून बाजूला करत हार्दिक पंड्या याला संघाचा कर्णधार बनवले. मागील महिन्यात मुंबईने पंड्याला गुजरात टायटन्स संघाकडून ट्रेड केले होते, ज्याची चांगलीच चर्चा रंगली होती. हार्दिकने गुजरातला पहिल्याच हंगामात किताब जिंकून दिला होता. तसेच, गतहंगामात संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. हार्दिक संघात आल्यानंतरच चर्चा रंगल्या होत्या की, त्याला मुंबईचा कर्णधार बनवले जाऊ शकते. अशात, मुंबईने त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय अनेक चाहत्यांना पटला नाही.

मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या याला आगामी आयपीएल 2024 हंगामात संघाचा कर्णधार म्हणून निवडताच चाहत्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी मुंबई इंडियन्सची टोपी, आणि जर्सी जाळली आहे, तर काहींनी सोशल मीडियावर मुंबईला अनफॉलो करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यानचे व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत दिसते की, एक चाहता मुंबई इंडियन्सची जर्सी जाळताना दिसत आहे. त्याने जर्सी एका लाकडावर टांगलेली असते, आणि तो जर्सीला काडी लावून पेटवतो. हा व्हिडिओ शेअर करत चाहत्याने लिहिले आहे की, “मुंबई इंडियन्स तुमच्यासोबत असेच केले पाहिजे.”

https://twitter.com/Shreyassp11/status/1735749215882731608

रोहित शर्माचा आणखी एक चाहता मुंबई इंडियन्सची टोपी जाळताना दिसत आहे. याचाही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1735748967894589912

एवढंच नाही, तर सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मुंबई इंडियन्सचे फॉलोव्हर्स झपाट्याने कमी झाले आहेत. मुंबईने 2 लाखांहून अधिक चाहते इंस्टाग्रामवर गमावले आहेत. तसेच, ट्विटरवर फ्रँचायझीला 4 लाखांहून अधिक युजर्सने अनफॉलो केले आहे. याव्यतिरिक्त रोहित आणि मुंबई इंडियन्स ट्रेंड होत आहेत.

https://twitter.com/ImTanujSingh/status/1735848657713516563

रोहित शर्माने नेतृत्वात बनला यशस्वी संघ
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून पुढे आला आहे. रोहितने 11 हंगामात संघाचे नेतृत्व केले होते. त्यात मुंबईने 5 वेळा आयपीएलचा किताब नावावर केला. रोहितने 2013मध्ये मुंबईचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020चा किताब जिंकला होता.

मात्र, मुंबईसाठी मागील तीन हंगाम चांगले गेले नाहीत. 2021मध्ये हार्दिक पूर्णपणे फिट नव्हता. त्यानंतर बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर होता. संघाने जोफ्रा आर्चरवर बोली लावली, पण तोही दुखापतीमुळे संघाकडून खेळू शकला नाही. आता आयपीएल 2024 हंगामात मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (hardik pandya replaces rohit sharma as captain fan burns mumbai indians jersey and cap farchise lose followers on social media platforms see here)

हेही वाचा-
‘खड्ड्यात गेली मुंबई इंडियन्स…’, रोहितला कर्णधारपदावरून हटवताच संतापले चाहते, सोशल मीडियावर MIची खरडपट्टी
असा कर्णधार होणे नाही! रोहितची आयपीएलमधील कामगिरी एकदा पाहा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---