सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या संघाला आयपीएल २०२२मधील पहिला पराभव पाहावा लागला. गुजरातने हा सामना ८ विकेट्स राखून गमावला. या सामन्यादरम्यान गुजरातकडून कर्णधार हार्दिक आणि हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. या युवा गोलंदाजाचा वेगवान चेंडू हार्दिकच्या हेल्मेटला लागला होता. आता या प्रसंगाबद्दल हार्दिकने प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण?
सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तिसऱ्या क्रमांकावरील साई सुदर्शन बाद झाल्यानंतर मैदानात उतरला. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर हार्दिकने वेगवान गोलंदाज टी नटराजनला चौकार मारला आणि तो कोणत्या विचारासह मैदानात आला आहे, हेदेखील स्पष्ट केले. हार्दिक पांड्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, पण वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याचा एक चेंडू त्याच्या हेल्मेटला जाऊन लागला.
उमरानने हा चेंडू साधारणतः १४० किमी ताशी वेगान टाकला (Umran Malik Hit Hardik Pandya’s Helmet) असावा, ज्याचा हार्दिकला लवकर अंदाज आला नाही. परिणामी हा वेगात आलेला चेंडू त्याच्या हेल्मेटला जाऊन लागला. उमरानने टाकलेला हा खतरनाक बाउंंसर हेल्मेटवर लागल्यानंतर हार्दिक हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने त्याला कोणती गंभीर दुखापत झाली नाही. त्याने तत्काळ तो ठीक असल्याची पुष्टी केली.
हेही वाचा- व्याजासकट परतफेड! उमरानने १४०kph वेगाचा चेंडू मारला, चिडलेल्या हार्दिकनेही दिले भारी प्रत्युत्तर
हार्दिक पंड्याने दिलेली प्रतिक्रिया
आता या प्रसंगाबाबत हार्दिकने प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिकला त्याची मजबूती दाखवायची होती. कारण यंदाची आयपीएल खूप कठीण आहे. अशात मलिकसारख्या युवा वेगवान गोलंदाजांना असेच जाऊ देऊ शकत नाही.
सामन्यानंतर उमरानसोबतच्या प्रसंगाबाबत हार्दिक (Hardik Pandya Responds On Umran Malik) म्हणाला की, “पूर्ण सन्मानासहित, मी अशा कोणत्याही युवा वेगवान गोलंदाजाला असेच जाऊ देऊ शकत नाही. यंदाची आयपीएल खूप अवघड आहे. त्यामुळे मी त्याला माझी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत होतो.”
हार्दिकने उमरानला दिले प्रत्युत्तर
उमरानचा चेंडू हेल्मेटला लागल्यानंतर हार्दिकने कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण पुढच्याच दोन चेंडूवर हार्दिकने त्याला लागलेल्या या चेंडूची कसर भरून काढली. उमरानने टाकलेल्या पुढच्या दोन्ही चेंडूवर हार्दिकने चौकार ठोकले. विशेष गोष्ट ही आहे की, हार्दिकने या दोन्ही चेंडूंवर ताकद कमी आणि गोलंदाजाच्या गतीचा उपयोग जास्त केला.
महत्त्वाच्या बातम्या-
आई गं! षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्रिपाठीने स्वत:लाच केले जखमी, वेदनेने मैदानावरच लागला तडफडू
आधीच जखमी असलेल्या दीपक चाहरबाबत वाईट बातमी, सीएसकेपुढील अडचणींमध्ये वाढ
IPL2022| आरसीबी वि. सीएसके सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, ‘हे’ खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!