---Advertisement---

शस्त्रक्रियेनंतर विराटने हार्दिक पंड्याला केला होता ‘हा’ मेसेज

On: सोमवार, जानेवारी 13, 2020 1:46 PM
---Advertisement---

भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला मागील अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर रहावे लागले आहे. त्याच्या या दुखापतीसाठी त्याला मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये शस्त्रक्रियाही करावी लागली.

या शस्त्रक्रियेनंतर आता हार्दिक त्याच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देत असून त्याचा पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न आहे. पण अशा शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणे कठीण असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच कोणालाही अशा अनुभवाला सामोरे जावे लागू नये अशी आशाही हार्दिकने व्यक्त केली आहे.

हार्दिक त्याच्या शस्त्रक्रियाबद्दल इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ‘मी विराटशी बोललो. त्याने माझ्या शस्त्रक्रियेनंतर एक संदेश पाठवला होता. त्यात माझी तब्येतीची चौकशी केली होती.’

“त्यावर मी त्याला(विराटला) उत्तर दिले की ‘मी ठिक आहे पण माझी आशा आहे की जगात कोणालाही पाठीची शस्त्रक्रिया करावी लागू नये.’ माझ्यावर त्यावेळी औषधोपचार सुरु होते आणि हे सर्व भावनिकदृष्याही आव्हानात्मक होते. 100 किलो वजन उचलण्यापासून मी माझा पाय उचलण्यास सक्षम नव्हतो.”

पंड्या अगामी न्यूझीलंड दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करेल अशी अनेकांना अपेक्षा आहे. पण त्याचे पुनरागमन त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. सध्या तरी न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---