भारतीय संघाचा (team india) दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik pandya) आगामी आयपीएल हंगामासाठी तयारी करत आहे. अयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचे कर्णधारपद हार्दिक सांभाळणार आहे. मागच्या हंगामात तो फिटनेस आणि खराब फॉर्ममुळे अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. परंतु आगामी हंगामासाठी मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तो गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
हार्दिक पांड्याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून चाहत्यांना त्याच्या फिटनेससंदर्भात चांगले संकेत दिले आहेत. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तो गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. मागच्या जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ हार्दिकला गोलंदाजी करता आलेली नव्हती. काही वेळा त्याने गोलंदाजीचा प्रयत्न केला, परंतु जास्त काळापर्यंत गोलंदाजी करू शकला नाही. अशात आयपीएल २०२२ पूर्वी त्याने चाहत्यांना या स्टोरीमधून एक आनंदाची माहिती दिली आहे.
दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये आठ ऐवजी १० संघ खेळताना दिसणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ पुढच्या हंगामापासून सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला बीसीसीआयने बेंगलोरमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव आयोजित केला आहे. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्या आणि राशिद खान या दोघांना प्रत्येकी १५ करोड रुपये मोजून संघात सामील केले आहे. तर शुबमन गिलसाठी गुजरात संघाने ८ करोड रुपये मोजले आहेत. मेगा लिलावासाठी आता संघाकडे ५२ करोड रुपये शिल्लक आहेत.
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. तसेच इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी यांची संघाच्या संचालकपदी नियुक्ती केली गेली आहे. भारताला २०११ साली विश्वचषक जिंकवून देणारे दक्षिण अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन संघाचे मेंटॉर आणि सोबतच फलंदाजी प्रशिक्षकही असतील.
रणजी ट्रॉफीतूनही घेतली माघार
दरम्यान, हार्दिकने टी२० विश्वचषकानंतर फिटनेसवर काम करण्यासाठी विश्रांती घेतली आहे. यादरम्यान तो भारतीय संघासाठी उपस्थित नसल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी स्पर्धा काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे, परंतु हार्दिकने या स्पर्धेतूनही माघार घेतली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत केदार देवधरला बडोदा संघाचा कर्णधार बनवले गेले आहे, तर विष्णु विनोद उपकर्णधार असेल. कृणाल पंड्या संघात सहभागी आहे.
महत्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणेचा आणखी एक सनसनाटी आरोप! वनडे कारकीर्दीविषयी म्हणाला…
INDvWI: तिसऱ्या वनडेत भारताने जिंकला टॉस, ११ जणांच्या संघातून केएल राहुलसह ४ खेळाडू बाहेर