अष्टपैल खेळाडू हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांची मैत्री घनिष्ठ आहे, हे जगजाहीर आहे. पंड्याने सोशल मीडियावर नुकतेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोन्ही खेळाडू विंटेज बाइकवर एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो रांचीतील असून, हार्दिक माहीच्या घरी पोहोचल्यावर विंटेज बाईकवर दोघांनी फोटो काढले. पंड्याने धोनीसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्या फोटोंना कॅप्शन लिहीले की, ‘शोले- 2 चा दुसरा भाग लवकरच येतोय’.
क्रिकेट विश्वातील जय वीरु म्हणजेच हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांची मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोघे एकमेकांसोबत खेळलेही आहेत. सध्या धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलमध्ये सक्रिय आहे आणि आगामी खेळासाठी सराव करण्यात व्यस्त आहे. त्याचबरोबर पंड्याकडे न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी (T-20 series) भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. हार्दिक पंड्या मागच्या काही माहिन्यांपासून भारताच्या टी-20 संघाचा नियमित कर्णधार बनण्यासाठी प्रमुख दावेदार आहे. अशात रोहितच्या अनुपस्थितीत न्युझिलंडविरुद्धची ही आगामी टी-20 मालिका जिंकल्यानंतर पंड्या स्वतःची कर्णधारपदासाठीची दावेदारी अधिक भक्कम करू शकतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली अशा वरिष्ठ खेळाडूंना आगामी टी-20 मालिकेत विश्रांती दिली गेल्यामुळे हार्दिक या मालिकेत संघाचे नेतृत्व करेल.
T-20 मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारीला रांचीच्या (JSCA) इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जाईल. आगामी सामन्यासाठी दोन्ही देशांचे संघ रांचीला पोहोचले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार संध्याकाळी ७ वाजता नाणेफेकीसाठी मैदानावर येतील. त्याच वेळी सामन्याचा खरा उत्साह अर्ध्या तासानंतर म्हणजे 7.30 वाजता सुरू होईल.
रांचीमध्ये असलेल्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समधील (JSCA International Stadium Complex) भारतीय संघाचा इतिहास शानदार आहे. भारतीय संघाने येथे आतापर्यंत एकूण तीन टी-२० सामने खेळले आहेत. या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने प्रत्येक सामना जिंकला आहे. भारतीय संघाने येथे श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या संघांशी स्पर्धा केली आहे. (Hardik Pandya share Photo with MS Dhoni on Social Media with Vintage bike in Ranchi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाजची दुखापतीमुळे माघार
राहुल-अथियाला भेटवस्तू देण्यासाठी विराटने खर्च केले दोन कोटी, धोनीनेही मोठ्या मानने दिले 80 लाखांचे खास गिफ्ट