---Advertisement---

हार्दिक पंड्याचा कहर!!! मोईन अलीच्या एकाच षटकात लगावले ३ गगन चुंबी षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: सोमवार, मार्च 29, 2021 12:01 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ धावांनी विजय मिळवला आहे. यासोबतच भारतीय संघाने ही मालिका २-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर ३३० धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने ३२२ धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता.

सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच खेळून काढले. हार्दिक पंड्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. यासोबतच त्याने मोईन अलीच्या एकाच षटकात ३ षटकार लांबच लांब लगावले होते. त्याच्या षटकारांचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1376124145608531970

पहिल्या डावात फलंदाजी करत असताना २८ वे षटक फेकण्यासाठी मोईन अली गोलंदाजीला आला होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने षटकार लगावला. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने पुन्हा एकदा षटकार लगावला. तसेच शेवटच्या चेंडूवर त्याने पुन्हा एकदा षटकार लगावला. यापूर्वी देखील त्याने फिरकी गोलंदाजांना एकाच षटकात ३ षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

हार्दिकने या सामन्यात ४४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. त्याने ५ चौकार आणि ४ षटकारांचा मदतीने आपल्या कारकीर्दीतील ७ वे अर्धशतक झळकावले.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत-इंग्लंड वनडे मालिकेत पडला षटकारांचा पाऊस; तीन सामन्यात मारले ‘इतके’ विश्वविक्रमी षटकार

INDvENG 3rd ODI: इंग्लंडच्या शेपटाची झुंज अपयशी; भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका घातली खिशात

हार्दिक पंड्याने घेतला मोईन अलीचा भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---