भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाहायला मिळाला. हा टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीचा चौथा सामना होता. या सामन्यात पाकिस्तान संघाच्या दोन फलंदाजांनी वादळी फलंदाजी करत अर्धशतक साकारले. मात्र, यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने पाकिस्तानच्या एका फलंदाजाला पराभूत केल्यानंतर त्याला दिलेली स्माईल चर्चेचा विषय ठरत आहे. यादरम्यानचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावा चोपल्या. यावेळी पाकिस्तानकडून सहाव्या क्रमांकावर हैदर अली (Haider Ali) फलंदाजीला आला होता. यावेळी त्याला जास्त वेळ मैदानावर टिकता आले नाही.
झाले असे की, हार्दिक पंड्या 14वे षटक टाकण्यासाठी आला होता. पंड्याच्या सहाव्या चेंडूवर हैदरने डीप मिडविकेटच्या दिशेने जोरदार फटका मारला. यावेळी त्याने मारलेला चेंडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने झेलला. यानंतर पंड्याने हैदरकडे बघून स्मित हास्य दिले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पंड्याचा हा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
एकाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “जर तू वाईट असशील, तर मी तुझा बाप आहे.”
https://twitter.com/GyaaniDurRhe/status/1584112412663300096
दुसऱ्या एकाने लिहिले की, “हार्दिक पंड्याची ती कमाल स्माईल.”
https://twitter.com/khudajaanee/status/1584114856000557056
Hardik Pandya smiling after taking Haider Ali's wicket. pic.twitter.com/biCN5qfrWt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 23, 2022
हार्दिक पंड्याची कामगिरी
हैदर अलीपूर्वी पंड्याने 14व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर शादाब खान यालाही झेलबाद केले होते. विशेष म्हणजे, शादाबदेखील सूर्यकुमारच्या हातातूनच झेलबाद झाला होता. पंड्याच्या गोलंदाजी कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याच्या गोलंदाजीवर 4 षटकार मारण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे भारतीय दोनच, एक अर्शदीप तर दुसरा….
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, यष्टीरक्षक म्हणून डीकेची संघात एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन