---Advertisement---

मुंबईत जुन्या मित्रांसोबत रमला अगस्त्य, पण अजूनही वडील हार्दिकशी भेट न झाल्याने चर्चांना उधाण

On: गुरूवार, सप्टेंबर 5, 2024 9:04 PM
agastya pandya
---Advertisement---

Agastya Pandya : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविच सध्या सोशल मीडियावर सक्रिय आहे. वास्तविक, हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळे झाल्यापासून त्यांचे नाते सतत चर्चेत आहे. कधी सोशल मीडियावर हार्दिकच्या इतर अभिनेत्रीसोबतच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत येत आहेत. तर कधी नताशाच्या रहस्यमयी पोस्टमुळे सोशल मीडिया यूजर्स आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. नताशा आणि हार्दिकने त्यांच्या घटस्फोटाचे कारण सांगितले नसले तरी ते त्यांचा मुलगा अगस्त्यला चांगले आयुष्य देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हार्दिकपासून विभक्त होताच नताशा आपल्या मुलासह सर्बियाला परत गेली होती, अलीकडेच नताशा सर्बियाहून मुंबईत परतली आहे. नताशा मुंबईत आल्यानंतर ती भारतात का परतली?, ती परत सर्बियाला जाणार की नाही? यावरुन सोशल मीडिया यूजर्स विविध अंदाज बांधत आहेत. मात्र, नताशा आणइ अगस्त्य अद्याप हार्दिकला भेटलेले नाहीत, कारण तसे फोटो समोर आलेले नाहीत. मात्र सध्या अगस्त्य त्याच्या वडिलांच्या घरी खूप एन्जॉय करत आहे.

अगस्त्य त्याच्या मित्रांना भेटायला गेला होता
अलीकडेच नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये अगस्त्य शाळेच्या वर्गात त्याच्या जुन्या मित्रांसोबत अभ्यास करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत अगस्त्य शाळेच्या पायऱ्यांवर त्याच्या मैत्रिणीचा हात हातात घेऊन चालताना दिसत आहे. मुंबईत आल्यानंतर चुलत भाऊ आणि मित्रांसोबत अगस्त्य खूप एन्जॉय करत आहे. सर्बियामध्ये त्याच्या आईच्या घरी देखील अगस्त्य खूप आनंदी होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात.

नताशा सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते
मात्र, अगस्त्य आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी शाळेत गेला होता, की त्याच शाळेत त्याला प्रवेश देण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नताशा मुंबईत आल्यापासून ती वेगवेगळ्या लोकांना भेटत आहे आणि व्हिडिओ शूट करत आहे. नताशाच्या इंस्टाग्राम स्टोरीज आणि पोस्ट्स पाहता ती तिच्या कामाच्या संदर्भात लोकांना भेटत असल्याचे दिसते.

हेही वाचा – 

प्रशिक्षक गंभीरने भारतीय संघाला दिलाय निर्भयपणे क्रिकेट खेळण्याचा ‘गुरुमंत्र’, जयस्वालचा खुलासा

इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार, दुसऱ्या देशात खेळली जाऊ शकते मालिका; काय आहे कारण?
भारतीय वंशाच्या स्टार क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये लढतोय आयुष्याची लढाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---