आयपीएल स्पर्धा आता ऐन रंगात आली आहे. आज (दि. 11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात अटितटीची लढत होणार आहे. अशात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी एक बॅड न्यूज समोर आली आहे. हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फसवणूक प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पण मंडळी, तुम्ही समजताय तो हार्दिक पांड्याचा भाऊ म्हणजे कृणाल पांड्या नाही तर तर हार्दिक पांड्याचा चुलत भाऊ आहे, ज्याला पोलिसांनी अटक केलीये.
हार्दिक आणि क्रृणाल पांड्या यांच्या चुलत भावाला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी वैभव पांड्या याला फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. वैभववर 4.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 37 वर्षीय वैभववर भागीदारी फर्मकडून सुमारे 4.3 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हार्दिक-कृणालचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ( Hardik Pandya stepbrother arrested for cheating cricketer of Rs 4.3 crore )
कथित चुकीच्या कामात निधीचा गैरवापर आणि भागीदारीच्या अटींचे उल्लंघन यांचा समावेश आहे. त्यामुळे वैभववर भागीदारी फर्मकडून सुमारे 4.3 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. चुकीच्या कामात निधीचा गैरवापर आणि भागीदारीच्या अटींचे उल्लंघन केल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अधिक वाचा –
– राजस्थानचा विजयरथ रोखण्यात गुजरातला यश, रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारली बाजी, गिल-तेवतिया-रशीद विजयाचे हिरो!
– क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला! ‘या’ 8 मैदानांवर होणार 2027 एकदिवसीय विश्वचषकाचे सामने
– महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा लिलाव उत्साहात, सोलापूर रॉयल्सकडून नौशाद शेखला सर्वाधिक किंमत