भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत तुफान कामगिरी केली. मात्र, उपांत्य सामन्यात पोहोचताच इंग्लंडचा सामना करताना त्यांना यश मिळाले नाही. इंग्लंडने या सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यामुळे भारतीय चाहत्यांची प्रचंड निराशा झाली. या सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंनी जीवाचं रान करत संघासाठी समाधानकारक धावसंख्या उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र, त्यांची ही मेहनत फळाला आली नाही. या पराभवानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा खूपच भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर आपले दु:ख व्यक्त केले.
हार्दिक पंड्याचे ट्वीट
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. हार्दिक पंड्या ट्वीट (Hardik Pandya Tweet) करत लिहितो की, “निराश आहे, धक्क्यात आहे. हा निकाल स्वीकारणे आम्हा सर्वांसाठी कठीण आहे. आम्ही आमच्या सहकारी खेळाडूंसोबतच्या नात्याचा पुरेपूर आनंद घेतला आहे. आम्ही प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसाठी लढलो. आमच्या सहाय्यक कर्मचार्यांच्या अनेक महिन्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या चाहत्यांचे आभार. आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत. असे घडायला नको होते, पण आम्ही लढत राहू.”
Devastated, gutted, hurt. Tough to take, for all of us. To my teammates, I’ve enjoyed the bond that we built – we fought for each other every step of the way. Thank you to our support staff for their endless dedication and hardwork for months on end. pic.twitter.com/HlVUC8BNq7
— hardik pandya (@hardikpandya7) November 10, 2022
पंड्याच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहते त्याला पाठिंबा देत आहेत, तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत.
सामन्याचा आढावा
इंग्लंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पंड्याने मोलाचे योगदान दिले. त्याने 33 चेंडूत 63 धावांची खेळी साकारत भारताला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 168 धावांपर्यंत पोहोचवले. हे आव्हान इंग्लंडने अवघ्या 16 षटकात एकही विकेट न गमावता पार केले. अशात हार्दिक पंड्याकडे आता भारतीय संघाचा भविष्यातील टी20 संघाचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. पंड्याने या पराभवानंतर त्याचे दु:ख व्यक्त केले आहे.
भारताचा न्यूझीलंडचा दौरा
टी20 विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर पडला आहे. यानंतर भारतीय संघाला आता न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात भारताला 3 सामन्यांच्या वनडे आणि 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्याची सुरुवात 18 नोव्हेंबरपासून होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी हार्दिक पंड्या याला कर्णधार बनवले आहे. आता या स्पर्धेत तो कशी कामगिरी करतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (hardik pandya tweeted after team india defeat against england t20 wc semi final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ 5 चुका आधीच सुधारल्या असत्या, तर भारत पाकिस्तानविरूद्ध खेळला असता फायनल
चहलवर अन्याय झाला का? संपूर्ण विश्वचषकात पाणीच पाजत राहिला ‘लेग स्पिन ग्रॅंडमास्टर’