भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याची पत्नी नताशा स्टॅनकोविक ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. पंड्याची पत्नी म्हणून तिची ओळख आहेच. परंतु तिने आपली स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केली आहे. पंड्या स्टार भारतीय क्रिकेटपटू आहे. तसेच नताशा एक उत्तम मॉडेल, नृत्यकार आणि अभिनेत्री आहे.
तिला अक्षर कुमारच्या हॉलिडे चित्रपटात एक पात्र करण्याची संधी मिळाली होती. तसेच सत्याग्रह चित्रपटात नृत्य आणि बिग बॉसमध्ये सहभागी होऊन तिने बॉलिवुडमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अशातच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नताशा यावेळी अहमदाबादमध्ये आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळाडूंना कुटुंबातील सदस्यांसोबत राहण्याची परवानगी दिली गेली आहे. अशातच नताशाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती नृत्य करताना दिसून येत आहे. तसेच यामधून स्पष्ट दिसत आहे की, ती सध्या फिटनेसवर लक्ष देत आहे.
तिने ‘आय एम बार्बी गर्ल’ या गाण्याच्या बोलांवर मनसोक्त नृत्य केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.
https://www.instagram.com/tv/CL1C55mAWjM/?utm_source=ig_web_button_share_sheet
नताशा आणि हार्दिकने १ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी साखरपुडा केला होता. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनतर ३१ मे २०२० रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकले होते. यानंतर ३० जुलै २०२० रोजी या दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या छोट्या पाहुण्याने प्रवेश केला होता. त्याचे नाव अगस्त्य असे ठेवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल आयोजनात तीन संघांचा खोडा! ‘हे’ कारण देत केली त्रयस्थ ठिकाणाची मागणी
शार्दुलचा सुपरहिट शो! विजय हजारे ट्रॉफीत एक-दोन नव्हे ५ गोलंदाजाना थकवलं, चोपल्या ‘इतक्या’ धावा
क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा एकेवेळचा संघसहकारीही आहे यात






