---Advertisement---

पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला फोटो; चाहते म्हणतात, भाभी…

On: बुधवार, जुलै 29, 2020 11:47 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू हार्दिक पंड्या लवकरच बाप बनणार आहे. त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिकने यापूर्वीही बेबी बंपसह फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर आता तिने पुन्हा एकदा आपला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. नताशाच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असून हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

नताशाने (Natasha Stancovic) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आव्हान स्विकारले.” पंड्याची पत्नी नताशाने ब्लॅक आणि व्हाईट फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो बोल्ड अंदाजातील आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/CDJj9Smgl-c/?utm_source=ig_web_copy_link

एका चाहत्याने लिहिले की, सुंदर फोटो, तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, भाभी छान दिसत आहात.

पंड्याने (Hardik Pandya) भारतीय संघात एक वेगळे स्थान मिळविले आहे. तो भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. पंड्याने आतापर्यंत ११ कसोटी सामने, ५४ वनडे सामने आणि ४० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५३२ धावा आणि १७ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने ९५७ धावा आणि ५४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी२०त त्याने ३१० धावा आणि ३८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलपूर्वी चाहत्यांना लुटता येणार या लीगचा आनंद; वेळापत्रकाची झाली घोषणा

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील विजयाचा फायदा; इंग्लंडने गुणतालिकेमध्ये घेतली मोठी झेप

-इंस्टाग्रामच्या खेळपट्टीवर अशी धमाकेदार खेळी करणारा विराट पहिला भारतीय

ट्रेंडिंग लेख-

-भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतक ठोकणारे ४ फलंदाज

-४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील

-५०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---