---Advertisement---

भारताच्या टी20 बरोबर वनडे संघाचाही कर्णधार होणार हार्दिक! रोहितचे आता कसे होणार?

On: गुरूवार, डिसेंबर 22, 2022 2:41 PM
Hardik-Pandya-and-Rohit-Sharma
---Advertisement---

वर्ष 2022 संपण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत, तरीही भारतीय संघातून निराशाजनक माहिती समोर येणे सुरूच आहे. हे वर्ष पाहिले तर भारतीय क्रिकेटसाठी तेवढे खास नाही ठरले. भारत आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला नाही, हे काही कमी होते संघ टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने मोठा पराभव केला होता. हे सर्व रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली घडले, यामुळे येत्या हंगामात भारताच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे.

मागील काही टी20 मालिकांमध्ये भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने केले, तर काही वनडे मालिकांचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) याने केले. तसेच इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यातही रोहित नाहीतर जसप्रीत बुमराह कर्णधार होता. हा सर्व प्रकार पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टी20 आणि वनडे संघांचा कर्णधार हार्दिकला करण्याची शक्यता आहे. यामुळे रोहित केवळ कसोटी संघाचा कर्णधार राहिल.

पुढीलवर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेपर्यंत तरी रोहितच कर्णधार असल्याची शक्यता होती, मात्र बांगलादेशच्या वनडे मालिकेने त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. भारताने बांगलादेशविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी गमावली. यामुळे भारताच्या नेतृत्वातील समीकरणात बदल दिसणार आहेत.

एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना म्हटले, ‘आमच्याकडे टी20 बरोबर वनडे संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याला नेमण्याचा प्लान आहे. त्याच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येतील.’

हार्दिकने मागील काही सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळी केली आहे. त्यानंतर त्याने नेतृत्व करत चाहत्यांचे मनही जिंकले. विराट कोहली याच्यानंतर रोहितला कर्णधार केले गेले, मात्र तो दुखापतींमुळे अनेक महत्वाच्या सामन्यांना मुकला आहे.

हार्दिकचे ‘नेतृत्व’
हार्दिकने आयपीएल 2022च्या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व (पहिल्यांदाच) करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने भारताचे 5 टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले, ज्यामधील चार सामने भारताने जिंकले, तर न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना बरोबरीत सुटला. त्याने कर्णधार म्हणून पदार्पण करताना आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका जिंकली होती. तसेच त्याच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड विरुद्ध एक-एक टी20 सामना जिंकला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023 Auction: पाकिटातील रक्कम, लिलावाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहायचे जाणून घ्या एकाच क्लिकवर
‘विश्वविजेता’ मेस्सी आणि पीएसजी करार वाढला! आणखी एका हंगामासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---