Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हार्दिकचा ऍटिट्यूड संघासाठी घातक! माजी दिग्गजाची कर्णधाराविषयी मोठी प्रतिक्रिया

हार्दिकचा ऍटिट्यूड संघासाठी घातक! माजी दिग्गजाची कर्णधाराविषयी मोठी प्रतिक्रिया

January 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik-Pandya

Photo Courtesy: Twitter/hardikpandya7


भारतीय संघाने मंगळवारी (3 जानेवारी) श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला. उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात असून मालिकेतील पहिला सामना भारताने दोन धावांनी नावावर केला. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळत नसल्यामुळे हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करत होता. हार्दिकला भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून देखील पाहिले जात आहे. पण मंगळवारी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर हार्दिक संघ सहकाऱ्यांसोबत ज्या पद्धतीने बोलला, ते माजी दिग्गज सबा करीम यांना खटकले.

सबा करीम (Saba Karim) भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचे वर्तन सबा करीम यांना खटकले. हार्दिक मालिकेतील पहिल्या सामन्यात संघातील सहकारी खेळाडूंवर दबाव टाकताना दिसला. यादरम्यान काही वेळा तो खेळाडूंवर रागावला देखील. सबा करीम यांच्या मते हार्दिकला त्याचे वर्तन बदलणे गरजेचे आहे.

माध्यमांशी बोलताना सबा करीम म्हणाले की, “मला वाटते त्याने स्वतःच्या वगण्यावर लक्ष दिणे गरजेचे आहे. एका खेळाडूच्या रूपात प्रत्येकाला त्याची वृत्ती प्रत्येकाला आवडते. पण एका कर्णधाराच्या रूपात तुम्ही मैदानात अशी वृत्ती दाखवत असाल, तर खेळाडू घाबरतात. मला नाही वाटत संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी ही गोष्ट योग्य आहे. तुम्हाला तुमच्या खेळाडूंवर विश्वास दाखवावा लागेल.”

“मला हार्दिकच्या दोन गोष्टी मात्र आवडतात. त्याला टॉसचा विचार न करता फलंदाजी करतो. म्हणजेच समोर येणाऱ्या अडचणींसाठी तो तयार असतो. तुम्हाला प्रत्येक सामन्यात काहीतरी नवीन शिकावे लागते. दुसरी गोष्ट आहे की त्याेने शिवम मावीला पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी दिली, म्हणजेच कर्णधाराच्या रूपात एक चांगले उदाहरण सिद्ध केले आहे,” असेही सबा करीम पुढे बोलताना म्हणाले. दरम्यान, उभय संघांतील दुसरा टी-20 सामना पुण्यात गुरुवारी (5 जानेवारी) खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्यामुळे  मालिकेतील पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये सॅमसन खेळू शकणार नाही. (Hardik Pandya’s attitude dangerous for the team! The former legend’s big reaction to the captain)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे शिवम मावीने गाजवलं मुंबाईचं वानखडे स्टेडियम अन् दुसरीकडे घरी कुटुंबीय…
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात हिंदू जिमखाना, डीव्हीसीए संघांचे वर्चस्व 


Next Post
Rahul tripathi

प्रतिक्षा संपली! राहुल त्रिपाठी करणार भारतासाठी पदार्पण, 'अशी' आहे प्लेइंग इलेव्हन

Velocity-vs-Supernovas

Womens IPL: सीएसकेसह 'या' चार संघांनी मागवली महिला आयपीएलसाठी बिडींग डॉक्युमेंट्स;

Photo Courtesy: Twitter/BCCI

सफल झाली सेवा! मोठ्या प्रतीक्षेनंतर घरच्या मैदानावर राहुल त्रिपाठीची स्वप्नपूर्ती

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143