ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि टी20 मालिकेत चमकदार कामगिरी करणारा भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या सुट्ट्यांची मजा घेत आहे. तसेच तो या दरम्यान सोशल मीडियावरही ऍक्टीव्ह असल्याचे दिसून आले आहे.
त्याने भारतीय अष्टपैलू केदार जाधवने इंस्टाग्रामवर टाकलेल्या एमएस धोनीच्या फोटोवर प्रतिक्रीया दिली आहे.
केदारने ‘अतिशय चांगली मालिका होती माही भाई. तुझ्याकडून नेहमीच खूप काही शिकायला मिळते’, असे कॅप्शन देत भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीचा फोटो टाकला होता.
या पोस्टला पंतने ‘भाई, चुकीने माझी जीन्स तुझ्याकडे आली वाटते’, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. तर धोनीने वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
पंत बरोबरच भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही केदारच्या पोस्टवर त्याची प्रतिक्रीया दिली आहे.
पंड्याला ‘कॉफी विथ करन’ या टिव्ही शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या विवादात्मक विधानांमुळे मागील काही दिवसांपासून टिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्याने सोशल मिडीयापासून दूर राहणेच पसंत केले होते. त्याने सोशल मीडियामधून चाहत्यांची माफी मागितलेला पोस्ट केला होता त्यानंतर तो सोशल मिडीयामधून गायबच झाला होता.
या प्रकरणामुळे या हार्दिक आणि केल राहुल या दोघांवरही बीसीसीआयने तात्पुरती निलंबनाचीही कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौराही अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागले आहे. तसेच त्यांना 23 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हा खेळाडू करतो एमएस धोनीला रोज फोन…
–एमएस धोनीसाठी फलंदाजीतील हा क्रमांक योग्य, कर्णधार कोहलीने केला खूलासा
–या संघांमध्ये होणार आहेत रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचे सामने