---Advertisement---

हार्दिक गोलंदाजी करणार का? विराटकडून आले ‘हे’ उत्तर

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 1:55 PM
hardik-pandya
---Advertisement---

टी २० विश्वचषक २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी (रविवारी) सामना खेळवला जाईल. या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०१९ च्या वनडे विश्वचषकानंतर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार विराट कोहली हा माध्यमांना सामोरा गेला. या सामन्याविषयी व भारतीय संघाविषयी त्याने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केला.

हार्दिकविषयी काय म्हणाला विराट?
विश्वचषकातील आपली मोहीम सुरू करण्यापूर्वी विराट आभासी पत्रकार परिषदेतून माध्यमांना सामोरा गेला. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. भारताचा प्रमुख अष्टपैलू मात्र सध्या दुखापतग्रस्त असलेला हार्दिक पंड्या या सामन्यात गोलंदाजी करणार का? असे विचारले असता तो म्हणाला,
“त्याच्यामध्ये वेगाने सुधारणा होत आहेत.आम्हाला आशा आहे की तो प्रत्येक सामन्यात दोन षटके गोलंदाजी करू शकतो. एक फलंदाज म्हणून आम्ही त्याचे नेहमीच समर्थन केले आहे. त्याला आम्ही काही षटके गोलंदाजी देण्यासाठी उत्सुक आहोत.”

विराटने भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी विचारले असता सांगितले,
“आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, इतक्यात त्याचा खुलासा करता येणार नाही. खेळपट्टी व इतर सर्व बाबींचा विचार करून प्लेइंग इलेव्हन निवडली गेली आहे. आमचे सर्वच खेळाडू आयपीएलपासून फॉर्मात आहेत.”
यावेळी विराटने हा सामना केवळ इतर सामन्यांसारखाच असेल असे स्पष्ट केले. भूतकाळात घडलेल्या घटनांपेक्षा आजचा विचार करायला हवा असे त्याने म्हटले. त्याने यावेळी पाकिस्तानी संघाचे कौतुक देखील केले.

पाकिस्तान विरुद्ध संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व वरूण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या-

क्या बात! केवळ चौदा चेंडूत रशीद बनला नंबर वन; नवा विश्वचषक विक्रम नावे

पाकिस्तानी महिला चाहतीचा राहुल-धोनीकडे सामना हरण्याचा हट्ट, मेंटॉरच्या उत्तराने केली बोलती बंद

हे फक्त भारतातच होऊ शकतं! पाकिस्तानचा फडशा पाडण्यासाठी वारासणीत ५०१ दिव्यांची गंगा आरती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---