---Advertisement---

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानचा अजून एक धक्का! दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर

On: मंगळवार, डिसेंबर 6, 2022 7:59 PM
Pakistan Test Team vs ENG
---Advertisement---

सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंनडने सोमवारी (5 डिसेंबर) नावावर केला. या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 74 धावा कमी पडल्या. उभय संघांत अजून दोन कसोटी सामने खेळायचे बाकी आहेत. तत्पूर्वी पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज हारिस रउफ दुखापतीच्या कारणास्तव कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.  

हारिस राउफ (Haris Rauf) मांडीच्या दुखापतीमुळे या कसोटी मालिकेतील पुढच्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. रउफच्या उजव्या मांडीचे सांसपेशी तानल्या गेल्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने मंगळवारी (6 डिसेंबर) याविषयी माहिती दिली. इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना 1 डिसेंबर रोजी सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी क्षेत्ररक्षण करताना रउफ चेंडूवर पडला आणि त्याला दुखापत झाली.  त्यानंतर त्याचा एमआरआय स्कॅन केला गेला आणि विश्रांतीचा सल्ला देखील मिळाला.

हारिस रउफने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 13 षटके गोलंदाजी केली आणि एक विकेट घेतली. मात्र दुखापतीमुळे दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी करता आली नाही.  पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, स्कॅनचा अहवाल आणि बोर्डाच्या मेडिडल टीमने केलेल्या तपासणीनंतर रउफला ग्रेड दोनची दुखापत झाल्याचे सांगितले गेले. माहितीनुसार आता रउफ लाहोरस्थित राष्ट्रीय हाय परफॉर्मंस सेंटरमद्ये दाखल होईल, ज्याठिकाणी त्याच्या दुखापतीवर उपचार आणि रिहॅबिलिटेशनला सुरुवात केली जाईल.

https://twitter.com/TheRealPCBMedia/status/1599999938142048256?s=20&t=FDGF6vVP5nR16P-Bu155jg

दरम्यान, उभय संघांतील कसोटी मालिकेचा एकंदरीत विचार केला, तर मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान संघ मागे पडला आहे. इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली असून उभय संघांतील दुसरा सामना 9 डिसेंबर रोजी सुरू होईल आणि  13 डिसेंबर रोजी संपेल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 17 ते 21 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. (Haris Rauf ruled out from test series against pakistan due to injury)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनकडून अनिल कुंबळेंना धक्का! दिग्गजाने रावलपिंडी कसोटीत रचला इतिहास  
आर अश्विनची भविष्यवाणी! आयपीएल 2023 च्या लिलावात ‘या’ खेळाडूवर लागणार सर्वात मोठी बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---