भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही या संघातील फलंदाज हरलीन देओलने एक अविश्वसनीय झेल टिपून सर्वांचे मन जिंकले होते. तो झेल टिपल्यानंतर सध्या ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. परंतु अनेकांना हे माहीत नसेल की, लहानपणी ती मुलांसोबत क्रिकेट खेळायची.
हरलीन देओलने वयाच्या ८ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. हरलीन देओलबद्दलची ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे की, ती मुलांसोबत क्रिकेट खेळायची. तिला क्रिकेटची प्रचंड आवड होती. परंतु जवळपास कोणी क्रिकेट खेळणारे नसल्यामुळे तिला मुलांसोबत क्रिकेट खेळावे लागायचे. त्यानंतर वयाच्या १३ व्या वर्षी तिने हिमाचलमधून क्रिकेटची प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली होती.
भारतीय महिला संघातील प्रतिभाशाली क्रिकेटपटू असलेली हरलीन शाळेत असताना एक उत्तम ॲथलिट देखील होती. तिला क्रिकेट व्यतिरिक्त हॉकी, फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये देखील रस होता. (Harleen deol used to play cricket with boys, because nobody was their to play with her)
इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात टिपला अविश्वसनीय झेल
हरलीन देओलच्या झेलबद्दल बोलायचं झालं तर तिने, इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना १९ व्या षटकात अविश्वसनीय झेल टिपला होता, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य झाले होते. तिने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना असा काही कारनामा केला होता ज्याची कोणी कल्पनाही नसेल केली. एमी जोन्सने शिखा पांडेच्या चेंडूवर षटकार अप्रतिम शॉट खेळला होता. प्रत्येकाला वाटते होते की, तो चेंडू आरामात सीमारेषेबाहेर ६ धावांसाठी जाईल.
परंतु तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या हरलीन देओलने हवेत उडी मारत झेल टिपला. झेल टिपल्यानंतर तिला जाणवले होते की, तिचा पाय सीमारेषेला स्पर्श करणार आहे. त्यामुळे तिने तो चेंडू आत फेकला आणि स्वतः सीमारेषेच्या बाहेर गेली होती. त्यानंतर चेंडू हवेत असतानाच तिने आत येऊन पुन्हा एकदा डाईव्ह मारत झेल टिपला होता.
इंग्लंड संघाने मारली १८ धावांनी बाजी
या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ७ बाद १७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय महिला संघाला १७८ धावांची गरज होती. परंतु या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे या सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसार भारतीय संघाला विजयासाठी ८.४ षटकात ७३ धावा करायच्या होत्या. परंतु भारतीय संघाला ३ बाद ५४ धावा करण्यात यश आले होते. हा सामना इंग्लंड महिला संघाने १८ धावांनी विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडने पाकिस्तानला पुन्हा एकदा पाजले पराभवाचे पाणी, सोप्या विजयासह मालिका घातली खिशात
सूर्यकुमारने निवडला सर्वकालिन आयपीएल संघ, यष्टीरक्षक म्हणून धोनीला नाही, तर ‘या’ खेळाडूला दिले स्थान






