कॅनबेरा । आज (31 जानेवारी) आंतरराष्ट्रीय टी20 तिरंगी मालिकेतील (T20 Tri Series) पहिला सामना भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला (Indian Women’s vs England Women’s) संघात पार पडला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा सामना भारतीय महिलांनी 5 विकेट्सने जिंकला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने दिलेल्या 147 धावांचा पाठलाग करताना भारताने 19.3 षटकात 5 बाद 150 धावा करत हा सामना जिंकला.
भारताकडून फलंदाजी करताना हरमनप्रीतने 34 चेंडूत नाबाद सर्वाधिक 42 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. हरमनप्रीतबरोबरच भारताच्या 15 वर्षीय शेफाली वर्माने (Shafali Verma) 30 आणि जेमीमाह रोड्रिगेजने (Jemimah Rodrigues) 26 धावा केल्या.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना कॅथरिन ब्रंटने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर सोफी इक्लेस्टोन (Sophie Ecclestone), नताली सायव्हर आणि हीथर नाइटने (Heather Knight) प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची कर्णधार हीथर नाइटने 44 चेंडूत सर्वाधिक 67 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. तर, टॅमी ब्यूमॉन्ट (Tammy Beaumont) 37 आणि नताली सायव्हरने (Natalie Sciver) 20 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
भारताकडून गोलंदाजी करताना राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad), शिखा पांडे (Shikha Pandey) आणि दीप्ती शर्मा (Dipti Sharma) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर राधा यादवने (Radha Yadav) एक विकेट घेतली आणि सामना जिंकण्यात मोलाची कामगिरी केली.
चौथ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियात झाले ३ बदल, रोहितसह या खेळाडूंना विश्रांती
वाचा????https://t.co/uSFEBixy6p????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020
…म्हणून केन विलियम्सन खेळणार नाही आज होणारा चौथा टी20 सामना
वाचा????https://t.co/z9AguAF0gf????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND #KaneWilliamson— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020





