---Advertisement---

VIDEO: स्वतः च्याच हलगर्जीपणावर भडकली हरमन, मैदानाबाहेर जाताना केले असे कृत्य

---Advertisement---

दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात गुरुवारी (23 फेब्रुवारी) पहिला उपांत्य सामना खेळला गेला. न्यूलॅंड्स येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात भारतीय संघाला 5 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. यासह भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारतीय संघासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर हिचे आक्रमक अर्धशतक व्यर्थ गेले. मात्र, ती अतिशय दुर्दैवीरित्या धावबाद होऊन परतली. त्यानंतर तिने रागाच्या भरात आपली बॅट फेकली.

https://twitter.com/AnupamKantMish5/status/1628794133270921217?t=zQX6hyaaV0qsgKq1N-S7xA&s=19

 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. शफाली वर्मा, स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया 30 धावांच्या आत तंबूत परतल्या. मात्र, त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्जने भारताचा डाव सावरला. दोघींनी 69 धावांची भागीदारी केली. जेमिमाने 24 चेंडूवर 43 धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर हरमनने आक्रमक फटके खेळत आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला विजयाच्या दिशेने नेले. मात्र, ती दुर्दैवीरित्या धावबाद झाली.

भारतीय संघाच्या विजयासाठी ‌‌‌‌‌40 धावांची गरज असताना दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ती होती. पहिली धाव घेतल्यानंतर ती काहीशी संथ झाली. ती दुसरी धाव पूर्ण करणार इतक्यात तिची बॅट मैदानावर अडकली. त्यामुळे ती धावबाद झाली. तिने 34 चेंडूवर 52 धावांची खेळी करताना 6 चौकार व 1 षटकार ठोकला.

बाद झाल्यानंतर हरमन चांगलीच संतापलेली दिसली. भारतीय डगआउटच्या शेजारी गेल्यानंतर तिने रागाच्या भरात आपली बॅट फेकली. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाला चौथ्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषकात पराभवाचा सामना करावा लागला. मागील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत देखील भारताला ऑस्ट्रेलियानेच पराभूत केलेले.

(Harmanpreet Kaur Angry Reaction On His Run Out In World Cup Semi Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेहमीप्रमाणे यावेळीही उपांत्य सामन्यात स्मृती मंधाना अपयशी, पाहा कसा आहे यापूर्वीचा रेकॉर्ड
आयसीसीने दिला नागपूर आणि दिल्ली खेळपट्टीला ‘रिमार्क’! भारतीय संघाला…

 ‌

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---