सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. भारतीय संघ सोमवारी (20 फेब्रुवारी) आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीसाठी मैदानावर येताच हरमनप्रीत कौर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सर्वाधिक टी20 सामने खेळण्याचा विक्रम केला.
🚨 Milestone Alert 🚨
First woman cricketer to play 1⃣5⃣0⃣ T20Is 🙌 🔝
Congratulations to #TeamIndia captain @ImHarmanpreet on a special landmark 👏 👏#INDvIRE | #T20WorldCup pic.twitter.com/X1DyIqhlZI
— BCCI Women (@BCCIWomen) February 20, 2023
हरमनप्रीत या सामन्यात मैदानावर उतरली तेव्हा तिने 150 व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पाऊल ठेवले. या यादीमध्ये न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्स 143 सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडची डॅनी वॅट 141 तर ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली 139 सामन्यांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. तर, ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू एलिस पेरी 137 सामन्यांसह पहिल्या पाचमध्ये समाविष्ट आहे.
हरमनप्रीत ही भारतीय पुरुष व महिला क्रिकेटमध्ये देखील 150 आंतरराष्ट्रीय टी20 खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरली. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा 148 सामने खेळून दुसऱ्या क्रमांकावर दिसतो. त्यानंतर वरिष्ठ फलंदाज विराट कोहली 115 व माजी कर्णधार एमएस धोनी 98 तिसऱ्या स्थानी काबीज आहे. महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने देखील आतापर्यंत भारतासाठी 115 सामने खेळले आहेत.
हरमनप्रीत कौर हिच्या आतापर्यंतच्या टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास तिने 2,993 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिची सरासरी 27.97 अशी राहिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला टी20 मध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तसेच, दुसऱ्यांदा महिला टी20 भारताचे नेतृत्व करताना दिसतेय.
(Harmanpreet Kaur Become First Indian Who Play 150 T20I Most Of Any Women Cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत थॉर, ब्लॅक पँथर्स संघांची विजयी सलामी
दिल्ली कसोटी गमावताच पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडला भारत! वाचा संपूर्ण प्रकरण