मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय मिहिला संघाचे नेतृत्व करणारी हरमनप्रीत कौर महिला टी-२० चॅलेंजमध्ये सुपरनोव्हाज संघाची कर्णधार आहे. २३ मे रोजी सुरू झालेल्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२८ मे) खेळला गेला. सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी या दोन सामन्यांमध्ये अंतिम सामना खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या नावावर या सामन्यादरम्यान एका खास विक्रमची नोंद झाली.
भारतामध्ये महिला क्रिकेटला प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महिला टी-२० चॅलेंज (Womens T20 Challenge) स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा पुण्यात आयोजित केली गेली. स्पर्धेत एकून तीन संघ सहभागी होते आणि अंतिम सामना धरून एकूण चार सामने खेळले गेले. अंतिम सामन्यात सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) फलंदाजीसाठी मैदानात येताच तिच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला.
महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा सुरू होऊन जास्त काळ झाला नसल्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंना खेळण्याची संधीची जास्त मिळाली नाहीये. मात्र, अशातही हरमनप्रीत पहिली खेळाडू बनली आहे, जिने या स्पर्धेत १० सामने खेळले आहेत. इतर कोणतीही महिला खेळाडू महिला टी-२० चॅलेंजमध्ये अद्याप १० सामने खेळू शकलेली नाहीये.
वेलोसिटी आणि सुपरनोव्हा संघातील ही अंतिम सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर वेलोसिटी संघाने नाणेफेक जिंकली आणि सुपरनोव्हाजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या वेलोसिटी संघाने सुपरनोव्हाजला २० षटकांमध्ये १६५ धावांवर रोखले. सुपरनोव्हाजने ही धावसंख्या उभी करण्यासाठी ७ विकेट्स गमावल्या.
सुपरनोव्हाजसाठी सलामीवीर डिएंड्रा डॉटीनने सर्वाधिक धावा केल्या. डॉटीनने या सामन्यात ४४ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत संघासाठी दुसरी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरली. हरमनप्रीतने २९ चेंडूत ४३ धावा केल्या. यामध्ये तिच्या १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुपर से भी ऊपर! ख्रिस लिनचा गगनचुंबी षटकार, स्टेडियमबाहेरील घरात जाऊन पडला चेंडू- Video
‘बॅट बॅगमध्ये पॅक कर आणि कुटुंबासोबत वेळ घालव’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाचा विराटला सल्ला