आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त झाली होती. मानेच्या दुखापतीमुळे ती चालू सामन्यात पॅव्हेलियनमध्ये परतली. आता भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असून हरमनप्रीत आज बुधवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळणार असून संघाचे कर्णधारपदही सांभाळणार असल्याचे सांगितले आहे.
हरमनप्रीत तंदुरुस्त असून आजचा (09 ऑक्टोबर) सामना खेळणार असल्याचे स्मृती मंधाना म्हणाली. दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू न शकलेल्या पूजा वस्त्राकरच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित केले जात होते. पूजाबद्दल अपडेट देताना मंधाना म्हणाली, “मला वाटतं की वैद्यकीय टीम पूजाला फीट ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उद्याच्या सामन्यापूर्वी अधिक माहिती उपलब्ध होईल. तिच्या फिटनेसबद्दल मी आत्ताच काही स्पष्टपणे सांगू शकत नाही.” पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाल्यास, भारत सध्या 2 सामन्यांत एक विजय मिळवून अ गटात चौथ्या स्थानावर आहे.
स्मृती मंधाना 2024 च्या टी20 विश्वचषकातील खराब फलंदाजीच्या फॉर्मशी झुंजत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिने 12 धावांची खेळी केली होती, तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ती केवळ 7 धावा करून बाद झाली. तिची जोडीदार शेफाली वर्मा चांगली धावा करत आहे, पण स्मृतीचा फॉर्म नसल्यामुळे टीम इंडियासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आश्या स्थितीत आजच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध तिच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा केली जात आहे.
यूएईच्या संथ खेळपट्ट्यांबाबत बोलतानास्मृती म्हणाली, “फलंदाज म्हणून येथील मैदानांची स्थिती तुमच्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळी आहे. त्यामुळे खेळाडूंना संघाचा धावगती सुधारण्यावर भर द्यावा लागेल, परंतु त्याच वेळी संघाने हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की संघ जिंकणे महत्वाचे आहे, जे आमचे पहिले प्राधान्य आहे.”
हेही वाचा-
ind vd nz; कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा, अनुभवी खेळाडू पहिल्याच सामन्यातून बाहेर, मोठे कारण समोर
ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय, न्यूझीलंडचा दारुण पराभव; भारताला फायदा?
“2 कोटींमध्ये काय…”, ऑलिम्पिक पदक विजेत्याच्या वडिलांची मागणी म्हणाले, एक फ्लॅट…