2 नोव्हेंबर ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमच खास म्हणून ओळखली जाईल. याच दिवशी भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात 52 धावांनी पराभूत करून महिला विश्वचषक 2025 चे विजेतेपद पटकावले.
लीग फेरीत भारत सलग 3 सामने हरला होता, त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण अखेर भारताने विश्वचषक जिंकताच हरमनप्रीतने आपल्या टीकाकारांना योग्य उत्तर दिलं.
ट्रॉफी स्वीकारण्यासाठी जेव्हा हरमनप्रीत कौर ICC चेअरमन जय शाह यांच्याकडे गेली, तेव्हा ती त्यांच्या पायाला स्पर्श करणार होती. मात्र जय शाह यांनी तिला तसं करू दिलं नाही.
याचं पहिलं कारण म्हणजे हिंदू धर्मातील एक मान्यता स्त्री ही शक्तीचं स्वरूप मानली जाते आणि म्हणूनच तिच्याकडून पाय स्पर्श करून घेतले जात नाहीत. महिलेला पूजनीय मानलं जातं. हो, काही वेळा स्त्रिया वडील, गुरु किंवा जेष्ठ व्यक्तींचे पाय स्पर्श करतात, पण ते आदरासाठी असतं.
जय शाह आणि हरमनप्रीत कौर यांचे वय जवळपास सारखेच आहे. त्यामुळे जर जय शाह यांनी तिला पाय स्पर्श करू दिले असते, तर ते स्त्रीचा अपमान मानला गेला असता.
या घटनेनंतर सोशल मीडियावर जय शाह यांचं भरभरून कौतुक झालं. लोक म्हणाले, जय शाह यांनी हरमनप्रीतला पाय न स्पर्श करू देता नारीशक्तीचा खरा सन्मान केला.
त्यांची ही कृती त्यांच्या चांगल्या संस्कारांचे प्रतीक असल्याचं सर्वत्र म्हटलं जात आहे.
जय शाह यांनी भारतीय महिला क्रिकेटचा विकास घडवण्यात मोठं योगदान दिलं आहे, आणि आता ICC चेअरमन म्हणून ते महिला क्रिकेटला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत.





