---Advertisement---

‘ही’ खेळाडू असेल आगामी विश्वचषकातील टीम इंडियाची उपकर्णधार, मिताली राजने सांगितले नाव

Mithali-Raj
---Advertisement---

भारताची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने शनिवारी (२६ फेब्रुवारी) पुढच्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकात हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) उपकर्णधारपदाची जबाबदारी देणार आसल्याचे सांगितले आहे. तसेच तिने युवा खेळाडूंना काही टिप्स देखाील दिल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी दिप्ती शर्माकडे देण्यात आली होती. हरमनप्रीत चौथ्या एकदिवसीय सामन्यात खेळत नव्हती, परंतु तिने पाचव्या सामन्यात पुनरागमन केल्यानंतर तिला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली नाही, तेव्हा दिप्ती उपकर्णधार होती.

याबाबत गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली की, “गेल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी दिप्तीला उपकर्णधार म्हणून निवडणे ही निवडकर्त्यांची आणि बीबीसीआयची निवड होती. हरमनप्रीत विश्वचषकासाठी उपकर्णधार आहे.” भारतीय महिला क्रिकेट विश्वचषक ४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत न्यूझीलंडमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध ६ मार्चला पहिला सामना खेळून या विश्वचषकाची सुरुवात करेल.

या विश्वचषकात कर्णधार मिताली तिच्या विश्वचषकाच्या अनुभवाचा फायदा घेत जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच, युवा खेळाडूंना देखील यातून प्रेरित करण्याचा ती प्रयत्न करणार आहे. ती युवा खेळाडूंना म्हणाली की, “तरुण खेळाडूंना माझे एकच आवाहन आहे की, त्यांनी या मोठ्या टप्प्याचा आनंद घ्यावा आणि कोणत्याही अतिरिक्त दबावाशिवाय खेळावे. जर त्यांनी दबाव घेतला, तर त्या या विश्वचषकात त्यांचे सर्वोत्तम देऊ शकणार नाहीत. गोलंदाजांना अजून थोडा वेळ लागेल, तर फलंदाजी युनिट एकत्र आली आहे.”

पुढे ती म्हणाली की, “कोव्हिडमुळे भारतातील खेळाडूंना सराव सत्र करण्याची संधी मिळाली नाही. विश्वचषकाच्या तयारीचा विचार करता न्यूझीलंडविरुद्धची मालिका संघासाठी अत्यंत महत्त्वाची होती.”

भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडविरुद्ध १-४ असा पराभव झाला. भारताने शेवटचा सामना जिंकला आणि भारताच्या आघाडीच्या फलंदाज स्म्रीती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि कर्णधार मिताली राज यांनी धावा केल्या. आता लवकरच विश्वचषकासाठी संघाची घोषणा होईल.

महत्वाच्या बातम्या-

पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

‘धोनीला भेटून माझे मोठे स्वप्न पूर्ण झाले’, पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला टी२० विश्वचषकादरम्यानचा किस्सा

केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---