---Advertisement---

बोंबला! हरमनप्रीतला ‘ते’ वागणं पडलं भलतंच महागात, संपूर्ण प्रकरण वाचा एकाच क्लिकवर

On: शनिवार, जुलै 29, 2023 12:19 PM
Harmanpreet Kaur
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ आशियाई क्रीडा स्पर्धा 2023साठी थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. हांगझो येथे होणारी आशियाई 2023 स्पर्धा 19 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत खेळली जाणार आहे. यात भारतीय महिला क्रिकेट संघ आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघ उपांत्यपूर्व सामने खेळण्यास पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा टी20 प्रकारात खेळली जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा नुकताच बांगलादेश दौरा संपला. यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने केलेल्या गैरवर्तनामुळे आयसीसीने तिच्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे तिला 2 सामने खेळता येणार नाहीत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने थेट उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. मात्र, संघ फक्त दोनच सामने खेळणार आहे. जर संघाने उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामने जिंकले, तरच संघाला अंतिम सामना खेळता येणार आहे. त्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) दोन सामने खेळता येणार नाहीत. भारताने जर हे दोन सामने जिंकले, तरच हरमनला अंतिम सामना खेळता येईल.

बीसीसीआयने आशियाई स्पर्धेसाठी आपला संघ आधीच जाहीर केला होता. यात हरमनप्रीतचाही समावेश आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत असल्याने आशियाई स्पर्धेत तीच कर्णधार पद सांभाळणार होती. आता मात्र तिला दोन सामने खेळता येणार नसल्याने भारतीय महिला संघाची कर्णधार कोण असणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संघाची उपकर्णधार आणि फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आहे. भारतासाठी स्मृतीने 119 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामुळे तिला चांगला अनुभवही आहे. आता बीसीसीआय हरमनच्या जागी स्मृतीला कर्णधार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023साठी भारतीय महिला संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा रेड्डी.

महत्वाच्या बातम्या:
अमेरिकेच्या मेजर लीगमध्ये MI न्यूयॉर्कचा जलवा! सुपर किंग्सच्या नांग्या ठेचत मिळवले फायनलचे तिकीट
स्मिथ बाद की नाबाद? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण- व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---