वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत 337 धावा कुटल्या. पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाज हारिस रौफ याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. मात्र, असे असले तरी त्याच्या नावे विश्वचषक इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम जमा झाला.
पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून या विश्वचषकात उतरलेल्या रौफला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यापासूनच तो अत्यंत महागडा ठरत गेला. अखेरच्या सामन्यातही त्याने तीन बळी मिळवले मात्र त्यासाठी तब्बल 64 धावा दिल्या. यानंतर त्याच्या नावे वनडे विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक महागडा गोलंदाज होण्याची कामगिरी जमा झाली.
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. त्याने या विश्वचषकात नऊ सामने खेळताना तब्बल 533 धावा लुटवल्या. त्याने इंग्लंडच्या आदिल रशिद याचा हा नकोसा विक्रम आपल्या नावे करून घेतला. रशिदने 2019 विश्वचषकात 526 धावा खर्च केल्या होत्या. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिलशान मधुशंका आहे. त्याने याच विश्वचषकात 525 धावा लुटवल्या आहेत. या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क असून, त्याने मागील विश्वचषकात 502 धावा दिल्या होत्या.
यासोबतच हारिस रौफ याच्या नावे एका विश्वचषकात सर्वाधिक षटकार देण्याचा लाजिरवाणा विक्रमही जमा झाला. त्याच्या गोलंदाजीवर या विश्वचषकात फलंदाजांनी तब्बल 16 षटकार ठोकले.
(Harris Rauf Conceded Most Runs And Sixes In One ODI World Cup Edition)
महत्वाच्या बातम्या –
रूटने रचला इतिहास! ईडन गार्डन्सवर पार केला इंग्लंड क्रिकेटमधील मैलाचा दगड
मार्शच्या नाबाद 177 धावांत बांगलादेशची धूळधाण! दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाचा पुण्यात पराक्रम