गेल्या २ वर्षांपासून कोरोना व्हायरस (Corona Virus) या जागतिक महामारीने जगभरात थैमान घातले आहे. यामुळे जगातील नियम व कायदे बदलले आहेत. अगदी क्रिकेट क्षेत्रही यापासून वाचलेले नाही. कोरोनानंतर गोलंदाजांना चेंडूला लाळ लावण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बहुदा सर्व सामने विनाप्रेक्षक खेळवले जात आहेत. याच बदलत्या नियमांदरम्यान आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफ (Haris Rauf) हा पहिल्यांदाच कोरोना सुरक्षित सेलिब्रेशन (Corona Safe Celebration) घेऊन आला आहे.
कोरोनादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टी२० लीग, बिग बॅश लीग २०२१-२२चा (Big Bash League 2021-22) थरार सुरू आहे. जगभरातील मातब्बर क्रिकेटपटू या लीगमध्ये सहभागी झाले आहेत. पर्थ स्कॉचर्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स यांच्यात झालेल्या बीबीएलमधील २७ व्या सामन्यात त्याने हे अनोखे सेलिब्रेशन केले आहे.
व्हिडिओ पाहा-
या सामन्यात मेलबर्न संघाचे प्रतिनिधित्व करत असताना तिसऱ्या षटकातच त्याने पर्थच्या सलामीवीर कर्टिस पीटरसनची विकेट घेतली. त्याच्या या षटकातील दुसरा चेंडू कर्टिसच्या बॅटच्या बाहेरच्या कडेल लागून मागे यष्टीरक्षकच्या हातात गेला. परिणामी ८ धावांवर फलंदाजी करत असलेला कर्टिस झेलबाद झाला.
सामन्यातील पहिलीच विकेट घेतल्यानंतर २८ वर्षीय राऊफने आनंदाने कोरोना सुरक्षित सेलिब्रेशन केले. हे सेलिब्रेशन करताना त्याने सुरुवातीला हात सॅनिटाईज करण्याचा संदेश दिला आणि त्यानंतर त्वरित खिशातून मास्क काढत तो तोंडावर लावला. क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच अशाप्रकारचे सेलिब्रेशन केले गेले आहे, ज्यामध्ये सेलिब्रेशनबरोबरच मोलाचा संदेशही दिला गेला. राऊफच्या या अनोख्या पण संदेशपूर्ण सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे.
Incredible COVID-safe wicket celebration from Harris Rauf! 🤣#BBL11pic.twitter.com/tG4QmFRbMO
— cricket.com.au (@cricketcomau) January 11, 2022
दरम्यान या सामन्यात मेलबर्न संघाला पर्थ संघाच्या फक्त ३ फलंदाजांना बाद करता आले. त्यातील २ विकेट्स राऊफनेच घेतल्या. कर्टिसबरोबरच त्याने यष्टीरक्षक लॉरी इव्हान्सलाही बाद केले. अशाप्रकारे ४ षटकांमध्ये ३८ धावा देत त्याने २ विकेट्स घेतल्या. परंतु पर्थ संघाने मेलबर्न संघाला १९७ धावांचे तगडे आव्हान दिल्यामुळे मेलबर्न संघाला विजयाची चव चाखायला मिळाली नाही. पर्थच्या आव्हानाचा पाठलाग करताना मेलबर्नचा संघ फक्त १४९ धावाच करू शकला आणि त्यंनी ४७ धावांच्या फरकाने हा सामना गमावला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटसाठी विहारीला नव्हे अजिंक्यला बाहेर बसवायचं होतं’, माजी भारतीय क्रिकेटरने रहाणेवर साधला निशाणा
व्याजासकट परतफेड! न्यूझीलंडने ३ दिवसात बांगलादेशला चारली पराभवाची धूळ; क्लीन स्विपची नामुष्कीही टळली
‘जेव्हा मी कर्णधार झालो, तेव्हा ७ व्या क्रमांकावर होतो’, कोहलीने सांगितले टीम इंडियाच्या यशाचे रहस्य
हेही पाहा-