---Advertisement---

अवघ्या 25 वर्षाच्या पठ्यानं मोडला किंग कोहलीचा विराट विक्रम, अशी कामगिरी करणारा एकमेव

On: सोमवार, सप्टेंबर 30, 2024 12:11 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत पाहुण्या संघाने इंग्लंडला मागे टाकत मालिकेवर कब्जा केला आहे. मिचेल मार्शच्या नेतृत्तवाखालील ऑस्ट्रेलियन संघाने बलाढ्य इंग्लंड विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर  3-2 ने मालिका जिंकले आहे. काल (29 सप्टेंबर) झालेल्या निर्णायक सामन्यात कांगारुंनी बाजी मारली. यजमान संघाचा डीएलएस नियमांनुसार 49 धावांनी पराभव झाला. त्यापूर्वी मालिका 2-2 अश्या रोमहर्षक स्थितीत होती.

मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडचा सध्याचा परमनंट कर्णधार जाॅस बटलर दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्याच्या जागी युवा हॅरी ब्रूकला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्याने देखील संधीचा फायदा घेत लाैकीकास साजेल अशी कामगिरी नक्कीच केला आहे. पण मालिका जिंकणयात तो मागे पडला. पण व्यक्ती कामगिरी म्हणून त्याने मोठी विक्रम रचला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार

312 – हॅरी ब्रूक (2024)*
310- विराट कोहली (2019)
285- एमएस धोनी (2009)
278- इऑन मॉर्गन (2015)

वास्तविक, कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे होता. विराट कोहलीने 2019 मध्ये झालेल्या वनडे मालिकेत धावांचा पाऊस पाडत 310 धावा केल्या होत्या. आता हॅरी ब्रुकने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. हॅरी ब्रुकने इंग्लंडकडून 312 धावा केल्या आहेत. तर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना एकाच मालिकेत 285 धावा केल्या होत्या. तर .या यादीत चाैथ्या स्थानी इंग्लडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन आहे. त्याने 2015 मध्ये 278 धावा केल्या होत्या.

हेही वाचा-

अद्भूत, अविश्वसनीय!! मोहम्मद सिराजचा मागे डाइव्ह मारत खतरनाक झेल; VIDEO एकदा पाहाच
‘रोहित शर्माला आरसीबीचे कर्णधार…’, लिलावाबाबत माजी खेळाडूचे वक्तव्य व्हायरल
रोहित नाही ‘सुपरमॅन’ म्हणा! एका हातानं असा झेल घेतला, ज्यावर कोणाचाच विश्वास बसेना! VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---