सध्या इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळवला जातोय. या कसोटी सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व बघायला मिळाले. रावळपिंडीच्या सपाट खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी काहीच मदत नव्हती, तर फलंदाजांनी या खेळपट्टीचा मनसोक्त फायदा घेतला. इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याने दोन्ही डावात झंझावती शतक झळकावले होते. हॅरीचे पाकिस्तान प्रेम काही नवीन नाही, त्याला पाकिस्तानला घरात घुसून मारायला आवडते.
हॅरी ब्रुक ( Harry Brook) नक्कीच पाकिस्तानच्या मैदानावर आपला पहिलाच कसोटी सामना खेळत आहे. मात्र, या आधी हा फलंदाज टी20 मालिका खेळला आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी इंग्लंड आणि पाकिस्तान या संघानी 7 टी20 सामन्यांची मालिका खेळली होती, ज्यात हॅरी ब्रुक याने धमाकेेदार प्रदर्शन केले होते. हॅरीने या मालिकेत 6 सामने खेळले होते, ज्यात त्याने तीन अर्धशतके लगावली होती. हॅरीने या मालिकेत 79.3च्या सरासरीने 238 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 163 इतका होता.
त्यानंतर तो कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात आला आणि कसोटी सामन्यात धुमाकूळ धातला. हॅरीने या सामन्याातील दोन्ही डावात एकूण 240 धावा केल्या. त्याची सरासरी 120 आणि स्ट्राईक रेट 132.6 इतका होता.
हॅरीने पहिल्या डावात 116 चेंडूत 19 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 153 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने 65 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या.
हॅरीने आतापर्यंत एकूण 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने खेळलेल्या 17 डावात त्याने एकूण 372 धावा केल्या. यात त्याचा उच्चांकी धावसंख्या 81 अशी होती. हॅरीने कसोटीमधील आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण 2022मध्ये सप्टेंबरमध्ये केले होते. त्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
या तीन कारणांनी अडले टीम इंडियाचे घोडे! बांगलादेशने दिली न भरून येणारी जखम
उर्वशी रौतेलाने अखेर मौन सोडले; म्हणाली ‘आरपी’ म्हणजे माझा…