भारताविरुद्ध झालेला पहिला टी२० सामना आयर्लंड संघाने ७ विकेट्सने गमावला. मात्र आयर्लंडचा २२ वर्षीय फलंदाज हॅरी टेक्टर याने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे आयर्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे नांग्या टाकत असताना हॅरीने एकाकी झुंज दिली आणि विस्फोटक अर्धशतकी खेळी करत संघाला १०८ धावापर्यंत पोहोचवले. त्याच्या ताबडतोब फलंदाजीवर भारताचा प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या हादेखील प्रभावित झाला आहे.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करताना ३३ चेंडूत नाबाद ६४ धावांनी प्रशंसनीय खेळी (Harry Tector 64 Runs Knock) त्याने केली. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ६ चौकार मारले. अर्थात ४२ धावा त्याने फक्त बाउंड्रींनी जोडल्या. त्याच्या या तोडफोड खेळीनंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिकने (Hardik Pandya) त्याची तोंडभरून प्रशंसा केली आहे. तसेच त्याने हॅरिला एक भेटही (Hardik Pandya Gifted Bat To Harry Tector) दिली आहे.
हार्दिक म्हणाला की, “त्याने (हॅरी टेक्टर) काही शानदार शॉट खेळले. तो आता तर २२ वर्षांचा आहे. मी त्याला एक बॅट भेट दिली आहे, जिच्या साहाय्याने तो आणखी षटकार मारेल आणि कदाचित आयपीएलचा करारही मिळवेल. माझ्याकडून त्याला शुभेच्छा. फक्त त्याला स्वतला सांभाळावे लागेल. त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. जर त्याने स्वत:ला क्रिकेटप्रती प्रेरित ठेवले, तर मला विश्वास आहे की, तो फक्त आयपीएलच नाही तर जगातील प्रत्येक लीगमध्ये खेळेल.”
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने हार्दिक आणि हॅरीमधील संवादाचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. हार्दिकच्या वक्तव्यावरून तर त्याची हॅरीवर नजर असल्याचे दिसत आहे. हार्दिक आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार असून त्याने संघाला पहिल्याच हंगामात विजेताही बनवले आहे. तसेच जर हॅरी आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकला, तर आयपीएलमध्ये खेळणारा पहिलाच आयर्लंडचा क्रिकेटपटू आहे.
https://twitter.com/BCCI/status/1541355696327114752?s=20&t=dhH6U1NgzXou4vEdNu8VsA
दरम्यान हॅरीने या सामन्यात आयर्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने एकट्याने जितक्या धावा केल्या, तितक्या धावा आयर्लंडचे इतर खेळाडू मिळूनही करू शकले नव्हते. आयर्लंडच्या ५ फलंदाजांनी मिळून ३९ चेंडूंत फक्त ३४ धावा जोडल्या होत्या. तर उर्वरित १० धावा वाईड आणि नो बॉलमुळे मिळाल्या होत्या.
ही खेळी त्याच्या टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक खेळीही आहे. २०१९ मध्ये नेदरलँडविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या हॅरीने या सामन्यापूर्वी ३२ सामने खेळताना ५४० धावा फटकावल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त २ अर्धशतके निघाली होती. मात्र भारताविरुद्धच्या ३३ व्या सामन्यात त्याच्या बॅटने आग ओकली आणि त्याने नाबाद ६४ धावा फटकावत टी२० कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ वैयक्तिक खेळी नोंदवली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बाबो! भुवनेश्वर कुमारने चक्क २०८ किमी दर ताशी वेगाने टाकला चेंडू, अख्तरचा मोडला वर्ल्डरेकॉर्ड?
दिपक हु्ड्डाच्या विस्फोटक खेळीनंतरही चहल का बनला सामनावीर? जाणून घ्या कारण
पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने रचला मोठा विक्रम; मोठ-मोठे खेळाडू पडले मागे