ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक सुरू झाला आहे. विश्वचषकातील पहिल्या फेरीतून श्रीलंका, नेदरलंड आणि आयर्लंड यांनी सुपर 12 फेरीसाठी जागा पक्की केली आहे. 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 फेरीला सुरुवात होईल. क्रिकेट जगतातील दिग्गज आणि जाणकार यावर्षीच्या टी-20 विश्वचषकाविषयी वेगवेगळे अंदाज आणि प्रतिक्रिया देत आहेत. दिग्गज क्रिकेट समालोचक आणि जाणकार हर्षा भोगले यांनी देखील टी-20 विश्वचषकातील सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. क्रिकेटविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या 11 खेळाडूंना या संघात निवडले गेले आहे.
हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी निवडलेल्या टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) या सर्वकालीन सर्वोत्तम फ्लेइंग इळेव्हनमध्ये फक्त एका भारतीयाला संधी मिळाली आहे. वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांतील प्रत्येकी दोन-दोन खेळाडू त्यांनी संघात घेतले आहेत. त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंडचे देखील प्रत्येकी एक-एक खेळाडू आहेत. भोगलेनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हा संघ आकड्यांच्या आधारे बनवला आहे. टी-20 विश्वचषकातील या खेळाडूंचे प्रदर्शन पाहूनच त्यांनी संघात घेतले गेले आहे. तसेच सर्व 11 खेळाडू त्याच क्रमांकावर आणि भूमिकेत असतील, जी त्यांनी स्वतःच्या संघासाठी पार पाडली आहे.
सलामीवीर फलंदाज – ख्रिस गेल आणि जोस बटलर
हर्षा भोगले यांनी आपल्या सर्वकालीन सर्वोत्तम टी-20 विश्वचषकाच्या संघात सलामीवीराच्या रूपात वेस्ट इंडीजचा दिग्गज ख्रिस गेल आणि जोस बटलर यांना निवडले. भोगलेंनी यावेळी बोलताना असेही सांगितले की, या स्थानासाठी डेविड वॉर्नर, तिलकरत्ने दिलशान आणि माहेला जयवर्धने देखील स्पर्धेत आहेत. पण आकड्यांच्या जोरावर बटलर या सर्वांच्या पुढे आहे. बटलर संघात अशल्यामुळे संघाला लेफ्ट राईट कॉम्बिनेश देखील मिळेल. गेलने टी-20 विश्वचषकात एकूण 31 डावांमध्ये 142.75 च्या स्ट्राईक रेटने 965 धावा केल्या. तसेच बटलरच्या नावावर या स्पर्धेत 21 डावांमध्ये 41 च्या सरासरीने 574 धावा आहेत.
मध्यक्रम – विराट कोहली, केविन पीटरसन आणि मायकल हसी
हर्षा भोगलेंनी त्यांच्या सर्वकालीन सर्वोत्तम टी-20 विश्वचषक संघातख मध्यक्रमात विराट कोहली, केविन पीटरसन आणि मायकल हसी यांनी निवडले आहे. आयसीसीच्या या प्रमुख स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटमधून 77 च्या सरासरीने धावा निघाल्या आहेत. तसेच 2014 आणि 2016 सालच्या टी-20 विश्वचषकात विराट प्लेअर ऑप द टूर्नामेंट ठरला होता. केविन पीटरसनची सरासरी 44.61 आणि स्ट्राईक रेट 148 राहिला आहे. तो 2010 टी-20 विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिला होता, जेव्हा इंग्लंडने या स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले होते. पाचव्या क्रमांकावर मायकल हसीला निवडले आहे. हसीची टी-20 विश्वचषकातील सरासरी 54.62 राहिली आहे.
अष्टपैलू – शाहिद आफ्रिदी आणि शेन वॉटसन –
हर्षा भोगलेंनी या संघात फिरकी अष्टपैलूच्या रूपात पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आणि वेगवान गोलंदाजी अष्टपैलूच्या रूपात शेन वॉटसन याला निवडले आहे. आफ्रिदीने टी-20 विश्वचषकात 6.72 च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या असून 39 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच दुसरीकडे वॉटसनने टी-20 विश्वचषकात एकूण 22 विकेट्स घेतल्या आहेत. आफ्रिदी टी-20 विश्वचषक 2007 साली मॅन ऑफ द टूर्नामेंट देखील राहिला आहे.
गोलंदाजी आक्रमण – उमर गुल, लसिथ मलिंगा, ट्रेंट बोल्ट आणि सॅमुअल बद्री
भोगलेंनी उमार गुल आमि लसिथ मलिगा यांनी शेवटच्या षटकांमधील प्रदर्शन पाहून त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले आहे. त्यांच्या मते हे दोन्ही गोलंदाज शेवटच्या षटकांमध्ये संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. तसेच पावरप्लेमध्ये विकेट्स घेण्याच्या दृष्टीने त्यांनी ट्रेंट बोल्टला संघात घेतले आहे. हर्षा यादरम्यान डेल स्टेनचा देखील विचार करत होते, पण शेवटी त्यांना डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला निवडले. संघा त्यानी सॅमुअल बद्रीला देखील निवडले.
हर्षा भोगलेंनी निवडलेली सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन –
क्रिस गेल, जोस बटलर, विराट कोहली, केविन पीटरसन, माइकल हसी, शाहिद अफरीदी, शेन वॉटसन, उमर गुल, लासिथ मलिंगा, ट्रेंट बोल्ट, सैमुअल बद्री.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शाहीन आफ्रिदी, नसीम शाह यांचा सामना करण्यासाठी कॅप्टन रोहितची खास ट्रेनिंग
मैदानावरच नव्हेतर मैदानाबाहेरही ‘किंग’ आहे कोहली! चाहत्यांना दिली अशी वागणूक; पाहा व्हिडिओ