---Advertisement---

साहाचे चुकले कुठे? भारताच्या दिग्गजाने पंतच्या सहाभागाबद्दल उपस्थित केला प्रश्न

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2020 11:54 AM
---Advertisement---

कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात (NZ Vs IND) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे.  या सामन्यात यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र, क्रिकेट जाणकार हर्षा भोगलेंनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मत मांडले आहे.

साहाला संघाबाहेर ठेवल्यामुळे भोगले म्हणाले की, “साहाला संघात घेण्यात आले नाही. या निर्णयाद्वारे भारताच्या प्रत्येक युवा यष्टीरक्षकाला संदेश दिला आहे. तो असा की, तुम्हाला यष्टीमागे उभा राहणारा सर्वश्रेष्ठ खेळाडू बनण्यावर नाही तर, यष्टी पुढे उभारून फलंदाजी करत अधिक धावा करण्यावर लक्ष द्यावे लागेल.” यापुढे ‘निराशाजनक’ असेही ते म्हणाले.

तसेच त्यांची नाराजीचे कारण सांगताना त्यांनी ट्विट केले की, “मला चूकीचे समझू नका. पण कसोटी सामन्यांचा विचार केला तर तु्म्ही तुमचे 5 उत्कृष्ट फलंदाज, 4 उत्कृष्ट गोलंदाज आणि एक उत्कृष्ट यष्टीरक्षक निवडता. असे असले तरी सहाव्या क्रमांकाच्या दुय्यम कौशल्याचाही विचार करायला हवा. मी अपेक्षा करतो की, पंत चांगली कामगिरी करेल. कारण तो एक उत्कृष्ट युवा खेळाडू आहे. परंतु मला साहाबद्दल वाईट वाटत आहे.”

त्याचबरोबर त्यांनी आर अश्विनच्या सहभागाबद्दल ट्विट केले की “अश्विन संघात असल्याचे पाहून छान वाटले. तो भारताचा सर्वोत्कृष्ठ फिरकीपटू आहे. याचबरोबर इशांतही तंदुरुस्त आहे आणि चांगला खेळत आहे.त्याच्या वेगवान गोलंदाजीचा या सामन्यात खूप उपयोग होईल.”

https://twitter.com/bhogleharsha/status/1230662070841987072

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---