---Advertisement---

हर्षल पटेलने मुंबई विरुद्ध ५ विकेट्स घेत केली कमाल, बेंगलोरकडून ही कामगिरी करणारा बनला तिसराच क्रिकेटर

---Advertisement---

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या सलामीच्या लढतीत शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध २ विकेट्सने विजय मिळवला. बेंगलोरच्या या विजयात ३० वर्षीय गोलंदाज हर्षल पटेलचाही मोठा वाटा होता. त्याने गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेण्याची अतुलनीय कामगिरी बजावली.

हर्षलची मुंबईविरुद्ध चमकदार कामगिरी

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडलेल्या बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्सला २० षटकांत १५९ धावांवर रोखले होते. या हर्षल पटेलची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने त्याच्या ४ षटकांत २७ धावा देत या ५ विकेट्स घेतल्या. त्याने मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्या (१३), ईशान किशनला( २८), कृणाल पंड्या(७), किरॉन पोलार्ड(७) आणि नवख्या मार्को जेन्सन(०) यांना बाद केले.

त्यामुळे तो आयपीएल इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना एका सामन्यांत ५ विकेट्स घेणारा केवळ तिसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी बेंगलोरकडून असा कारनामा केवळ अनिल कुंबळे आणि जयदेव उनाडकटलाच करता आला आहे.

उनाडकटने १० मे २०१३ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना पहिल्यांदा एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ५ विकेट्स चटकावल्या होत्या. तसेच त्यापूर्वी अनिल कुंबळेने २००८ सालच्या पहिल्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध ३.१ षटकांत ५ धावा देत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

बेंगलोरने मिळवला विजय

आयपीएल २०२१ हंगामातील पहिल्या सामन्यांत बेंगलोरने मुंबईला १५९ धावांवर रोखले. त्यानंतर १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

वाह रे पठ्ठ्या! गेल्या १३ वर्षांत मुंबई इंडियन्सविरुद्ध कोणालाही जमला नव्हता ‘तो’ विक्रम हर्षल पटेलने करुन दाखवला

केवळ एमएस धोनी आणि पोलार्ड यांचा समावेश असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता डिविलियर्सही सामील

बापरे! झेल घेण्याच्या प्रयत्नात विराटच्या डोळ्याखाली जोराने आदळला चेंडू; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---