इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील ५२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना ३ गडी बाद करत हर्षल पटेलच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३ गडी बाद केले. यासह तो आयपीएल स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. हर्षल पटेलने आयपीएल २०२१ स्पर्धेतील १३ सामन्यात एकूण २९ गडी बाद केले आहेत. या बाबतीत त्याने मुंबई इंडियन्स संघाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. त्याने २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत २७ गडी बाद केले होते. तसेच तिसऱ्या स्थानी भुवनेश्वर कुमार आहे. त्याने २०१७ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत एकूण २६ गडी बाद केले होते.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
२९ गडी – हर्षल पटेल , २०२१*
२७ गडी – जसप्रीत बुमराह, २०२०
२६ गडी – भुवनेश्वर कुमार,२०१७
२४ गडी – जयदेव उनाडकट,२०१४
२४ गडी – हरभजन सिंग,२०१३
तसेच हर्षल पटेलला आणखी एक मोठा विक्रम करण्यासाठी अवघे ३ गडी बाद करण्याची गरज आहे. येणाऱ्या सामन्यात ३ गडी बाद करताच तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक गडी बाद करण्याचा पराक्रम करू शकतो. या यादीत सर्वोच्च स्थानी ड्वेन ब्रावो आहे, ज्याने २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ३२ गडी बाद केले होते. तर कागिसो रबाडाने २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ३० गडी बाद केले होते. तर हर्षल पटेल २९ गडी बाद करून या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
आयपीएल स्पर्धेत एकाच हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
३२ गडी – ड्वेन ब्रावो,२०१३
३० गडी – कागिसो रबाडा, २०२०
२९ गडी – हर्षल पटेल,२०२१*
२८ गडी – लसिथ मलिंगा, २०११
२८ गडी – जेम्स फॉल्कनर, २०१३
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचे खास असूनही दुर्लक्ष, दुधातून माशी काढावी तसे ‘या’ ३ खेळाडूंना टी२० विश्वचषकातून ठेवले बाहेर
जमतंय जमतंय! धनश्रीच्या तालात ताल मिसळत पंजाबी गाण्यावर थिरकला चहल, व्हिडिओला चाहत्यांची पसंती
क्रिकेटपटू, यष्टीरक्षक आणि कर्णधारानंतर एमएस धोनी दिसणार अभिनेत्याच्या भूमिकेत? दिले ‘असे’ उत्तर