टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. ही कामगिरी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील सुरू ठेवली आहे. शुक्रवारी (३ सप्टेंबर ) भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तिरंदाज हरविंदर सिंगने तिरंदाजीमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.
त्याने भारताला पॅरालिम्पिक २०२० मधील १३ वे पदक मिळवून दिले आहे. त्याने शूट ऑफमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या तिरांदाजाला ६-५ ने पराभूत केले. या सामन्यातील ५ सेट झाल्यानंतर दोन्ही खेळाडू बरोबरीत होते. त्यानंतर शूट ऑफमध्ये किमने ८ गुणांवर निशाणा साधला तर हरविंदर सिंगने १० गुणांवर निशाणा साधत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
हरविंदर सिंग जकार्ता एशियन गेम्स २०१८ मध्ये पॅरा तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला होता. हरविंदर सिंगचा जन्म मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. दरम्यान दीड वर्षाचा असताना त्याला डेंग्यू झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला चुकीचे इंजेक्शन दिले होते.परिणामी त्याच्या पायांनी व्यवस्थित काम करणे बंद केले होते.
हरविंदरने शुक्रवारी (३ सप्टेंबर) एकूण ५ सामने खेळले होते. त्याने पहिल्या फेरीत इटलीच्या स्टेफानो ट्रावीसानीला पराभूत केले. त्यानंतर पुढील फेरीत त्याने बातो सिडेनडरहजहेवला पराभूत केले होते. तसेच तिसऱ्या फेरीत त्याने जर्मनीच्या मेक सजारसजेवस्कीला ६-२ ने पराभूत करत उपांत्यफेरी गाठली होती. परंतु उपांत्यफेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या केविन माथरने त्याला पराभूत केले होते. माथरने हरविंदर सिंगला ४-६ ला पराभूत केले होते.
शुक्रवारी (३ सप्टेंबर) भारतीय खेळाडूंनी ३ पदकांची कमाई केली आहे. प्रवीण कुमारने भारताला पुरुषांच्या उंच उडी टी ६४ स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. तर निशानेबाज अवनी लेखराने ५० मीटर राइफल थ्री पोजिशन एसएच १ मध्ये कांस्यपदक मिळवून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद २३ हजार धावा करणारे ३ फलंदाज, पहिल्या दोन क्रमांकावर भारतीयांचा कब्जा
टी२० विश्वचषकात ‘युनिवर्स बॉस’ गेलच्या वेगवान शकताचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेले ६ फलंदाज
आकरा खेळाडू मिळूनही करु शकले शेवटच्या फलंदाजाला बाद, सामना राहिला अनिर्णीत; पाहा व्हिडिओ