एमएस धोनी वयाच्या 42व्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत आहे. पाच वेळा सीएसकेला आयपीएल चॅम्पियन बनवल्यानंतर धोनीने यावर्षी संघाचे कर्णधारपद सोडले. पण नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला पडद्यामागून धोनीचे मार्गदर्शन मिळत आहे. धोनीने मंगळवारी (26 मार्च) गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात दाखवलेली चपळाई पाहून स्टीव स्मिथ याने धोनीचे कौतुक केले.
सीएसकेने गुजरात टायटन्सविरुद्धचा (CSK vs GT) हा सामना 63 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 6 बाद 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 8 बाद 143 धावांपर्यंत कशीबशी मजल मारली. गुजरात संघ लक्ष्या पाठलाग करत असताना धोनीने आठव्या षटकात एक अप्रतिम झेल पकडला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत धोनीने जबरदस्त डाईव्ह मारून विजय शंकर याला यष्टीपाठी झेलबाद केले. हा झेल पाहून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव स्मिथ याने खास प्रतिक्रिया दिली.
स्मिथ स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, “असे वाटत आहे की, धोनी भूतकाळात गेला आहे. त्याने 2.27 मीटरच्या आसपास डाईव्ह मारली. हा खूपच अप्रतिम झेल होता. तो विकेट्सपासून जास्त अंतरावर नव्हता. कारण डेरिल मिचेल जास्त वेगाने चेंडू टाकत नाही. त्याच्याकडे हालचाल करण्यासाठी जास्त वेळ नव्हता. पण तरी त्याने हा सुंदर झेल पकडला. त्याने मैदानातील अंतर अप्रतिम पद्धतीने कापले आणि चेंडूत त्याच्या हाताला अगदी चिकटला होता.”
स्मिथने पुढे शिवम दुबे याचेही कौतुक केले. तो म्हणाला, “सध्यातरी शिवम दुबेमध्ये खूप आत्मविश्वास दिसत आहे. खासकरून फिरकीपटूंविरोधात त्याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारला आणि नंतर मागे वळून पाहिलेच नाही. तो चेंडूकडे पाहतो आणि योग्य जागी मारतो. दुबे खरोखर सध्या चांगली फलंदाजी करत आहे.”
दरम्यान, सीएसकेला आयपीएलच्या चालू हंगामातील आपला पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. हंगामातील पहिल्या सामन्यात सीएसकेने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध, तर दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध जिंकला आहे. (Has Dhoni gone to the past? Former CSK captain praised by Australian legend)
महत्वाच्या बातम्या –
“मुंबईत हार्दिक पांड्याविरोधात आणखी हूटिंग होईल”, माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केली भीती
वय 35 अन् चपळता चित्त्यासारखी! अजिंक्य रहाणेनं हवेत उडी मारून घेतलेला ‘हा’ झेल एकदा पाहाच