---Advertisement---

“रोहितला बाद कसे करावे हे समजत नाही”; पाकिस्तानी गोलंदाजाचा मोठा खुलासा

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 5:22 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याची भारत- पाकिस्तानातील नव्हे तर जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येत असतात, त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो. त्याच वेळी आता पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली याचे एक विधान समोर आले आहे.

त्याला कसे बाद करावे?
मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली हा एक मुलाखत देताना दिसतोय. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने अली याला प्रश्न विचारला की,
“गोलंदाजी करताना असा कोणता फलंदाज वाटला आहे ज्याला पाहून असे वाटत होते की, याला कसे बाद करावे?”
त्यावर उत्तर देताना अली म्हणाला,
“होय, तो फलंदाज म्हणजे भारताचा रोहित भाई. २०१९ विश्वचषकाच्या वेळी तो असा खेळत होता की त्याला कसे बाद करावे हे समजत नव्हते. त्याने शतक देखील ठोकले.”

रोहितने मॅंचेस्टर येथे झालेल्या २०१९ वनडे विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सामन्यात ११३ चेंडूमध्ये १४० धावांची शानदार खेळी केली होती. भारताने ठेवलेल्या ३३७ धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा संघ २१२ धावांमध्ये ढेपाळला होता.

पाकिस्तान विरुद्ध संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व वरूण चक्रवर्ती.

भारताविरुद्ध पाकिस्तानचा संभाव्य संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रीदी, शोएब मलिक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---