दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला हा त्यांच्या देशाचा एक अव्वल फलंदाज होता. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्याने अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेसाठी शानदार कामगिरी केली होती. त्याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतला. मात्र निवृत्तीनंतर देखील त्याच्या फलंदाजीची धार कमी झाली नाही, हे त्याने नुकतेच सिद्ध केले.
कौंटी क्रिकेटमध्ये धावांचा रतीब
हाशिम आमला सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळतो आहे. या स्पर्धेत सरे संघाकडून खेळतांना त्याने कमालीचे प्रदर्शन केले आहे. त्याने नुकतीच ग्लूस्टेशायर संघाविरुद्ध खेळतांना लाजवाब शतकी खेळी उभारली. या सामन्यात त्याने ३४७ चेंडूत १७३ धावांची खेळी केली. यात १६ चौकारांचा समावेश होता. आमलाच्या या खेळीच्या जोरावर सरे संघाने या सामन्यात ४७३ धावांचा डोंगर उभा केला. याआधी हॅंपशायर संघाविरुद्धच्या सामन्यात देखील त्याने अप्रतिम द्विशतक झळकवले होते. त्या सामन्यात त्याने २१५ धावांची खेळी केली होती.
The ever brilliant Hashim Amla with another century for Surrey!
How good will it be when he's back in SA cricket?! #CountyChampionship #cricket pic.twitter.com/8ViJpZZh5Y
— ThePoppingCrease (@PoppingCreaseSA) May 27, 2021
👨🎓 A master heading to work.
Was Hashim Amla the stand out player on the first day? pic.twitter.com/F63H2rUljj
— Surrey Cricket (@surreycricket) May 28, 2021
हाशिम आमलाच्या नावे झाला विक्रम
कौंटी क्रिकेट २०२१ मध्ये आता हाशिम आमलाच्या नावे एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. या कौंटी हंगामात सरे संघाकडून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत या हंगामात ५७.७०च्या सरासरीने ५७७ धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडचा ओली पोप ५५५ धावांसह दुसर्या स्थानी आहे. तर रॉरी बर्न्स ५५४ धावांसह तिसर्या स्थानी. पण ३८ वर्षीय हाशिम आमलाने आपल्या सर्वांगसुंदर फलंदाजीने युवा खेळाडूंनाही मागे टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
🎥 | HIGHLIGHTS
All the action from the second day of our @CountyChamp game against @Gloscricket pic.twitter.com/SRXC80XKD4
— Surrey Cricket (@surreycricket) May 28, 2021
हाशिम आमलाची कारकीर्द
हाशिम आमलाने २०१९ साली निवृत्ती घेण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून १२४ कसोटी सामने खेळतांना ४६.४१ च्या सरासरीने तब्बल ९२८२ धावा काढल्या. यात ४ द्विशतक आणि २८ शतकांचा समावेश होता. याचबरोबर त्याने दक्षिण आफ्रिकेकडून १८१ वनडे सामने देखील खेळले. ज्यात ४९.४७च्या सरासरीने त्याने ८११३ धावा काढल्या. यात त्याने २७ शतके आणि ३९ अर्धशतके झळकावली.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या लाडक्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार ‘या’ दिवसाची प्रतिक्षा
‘त्या’ काळात मी आठ-नऊ दिवस न झोपता सामने खेळत होतो, अश्विनचा धक्कादायक खुलासा
“एकाच वेळी भारताचे तीन दर्जेदार संघ खेळू शकतात”, पाकिस्तानच्या दिग्गजाकडून कौतुक