लंडन। शनिवारी(29 जून) 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर 37 वा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडला 86 धावांनी पराभव स्विकारावा लागला. असे असले तरी या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने घेतलेल्या हॅट्रिकची चांगलीच चर्चा झाली.
त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडकडून शेवटचे षटकात गोलंदाजी करताना सलग तीन चेंडूवर विकेट घेत हॅट्रिक साजरी केली. त्याने या षटतील तिसऱ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला यॉर्कर टाकत त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने मिशेल स्टार्कलाही यॉर्कर टाकत त्रिफळाचीत केले.
यानंतर हॅट्रिक चेंडूवर बोल्टने जेसन बेऱ्हेंडॉर्फला पायचित केले. यावर बेऱ्हेंडॉर्फने रिव्ह्यूची मागणी केली. पण रिव्ह्यूमध्येही बेऱ्हेंडॉर्फ बाद असल्याचे दिसले. त्यामुळे ट्रेंट बोल्ट हा विश्वचषकात हॅट्रिक घेणारा न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला.
तसेच बोल्ट 2019 च्या विश्वचषकात हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफगाणिस्तान विरुद्ध हॅट्रिक घेतली होती.
ट्रेंट बोल्टच्या या हॅट्रिकमुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकात 9 बाद 243 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरे(71) आणि उस्मान ख्वाजा(88) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. तर न्यूझीलंडकडून बोल्टने हॅट्रिकसह सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
त्यानंतर 244 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा डाव मात्र 43.4 षटकात सर्वबाद 157 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
A ???????????? to @trent_boult was the bowling highlight for the @blackcaps. The second of his career and also the second of this @cricketworldcup!
Watch all of the New Zealand wickets ????#BACKTHEBLACKCAPS | #CWC19 pic.twitter.com/AKIfW8XWjX
— ICC (@ICC) June 29, 2019
☝️ ☝️ ☝️ Woohoo ????
Excited fans wait with our Insider Niall O'Brien as the third umpire confirms Trent Boult's hat-trick! #BackTheBlackcaps #CWC19 pic.twitter.com/R6GLr3YZWl— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 30, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मार्टिन गप्टिलने घेतला स्टिव्ह स्मिथचा एका हाताने जबरदस्त झेल, पहा व्हिडिओ
–क्रिकेट नाही तर आता या क्षेत्रातून मनोरंजन करणार युवराज सिंग
–८ धावांवर बाद होऊनही फिंचचा झाला सचिन-हेडन सारख्या दिग्गजांच्या यादीत समावेश






