भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग लवरकच वडील होणार आहे. तो वडील झाल्यानंतर च कोचिंग (प्रशिक्षण) किंवा समालोचन करण्याचा विचार करणार आहे.
इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनबरोबर (Kevin Pietersen) झालेल्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान युवराजने (Yuvraj Singh) सांगितले की, तो परिवाराबरोबर वेळ घालवत आहे. तसेच तो लवकरच वडील (Father) होईल अशीही आशा व्यक्त केली. त्यानंतर मी कोचिंगमध्येही (Coaching) पाऊल ठेवण्याचा विचार करत आहे. युवराजने २०१६ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचबरोबर (Hazel Keech) लग्न केले होते.
युवराज म्हणाला की, “तो क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर काम करू शकतो. मला समालोचनापेक्षा कोचिंगमध्ये अधिक आवड आहे.”
पीटरसनने युवराजला समालोचनामध्ये येण्यास सांगितले होते. त्यावर युवराजने म्हटले की, त्याला काही काळ क्रिकेटपासून ब्रेक घ्यायचा आहे.
भारताला २००७चा टी२० विश्वचषक आणि २०११ चा वनडे विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात युवराजने मोलाची कामगिरी बजावली होती. २०११च्या विश्वचषकात युवराजला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
युवराजने आपल्या कारकीर्दीत एकूण ४० कसोटी सामने, ३०४ वनडे सामने आणि ५८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-५ असे क्रिकेटर ज्यांचे संघातच होते मोठे दुश्मन, दोन जोड्या आहेत भारतीय
-टीमचा कोच म्हणतोय, तुझी आता टीममध्ये जागा नाही
-इंग्रजी बोलता न आलेल्या बाबर आझमने केला असा पलटवार