भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला वनडे सामना ३ धावांनी जिंकला. हा सामना जिंकत भारतीय संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकून देण्यात प्रभारी कर्णधार शिखर धवन याचा मोठा हात राहिला. तसेच यष्टीरक्षक संजू सॅमसन याने अखेरच्या षटकात एक चौकार अडवत संघाच्या विजयात योगदान दिले. मात्र फलंदाजीत त्याने निराशा केली. यानंतर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया याने सॅमसनचे कान टोचले आहेत.
सॅमसनने (Sanju Samson) जुलै २०२१ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास एका वर्षाने त्याचे वनडे संघात पुनरागमन झाले. मात्र या संधीचे नाणे तो खणखणीत वाजवू शकला नाही. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध (WIvsIND) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १८ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने फक्त १२ धावा केल्या आणि रोमॅरियो शेफर्डच्या हातून पायचित झाला.
यानंतर सॅमसनवर निशाणा साधत कानेरियाने (Danish Kaneria) म्हटले आहे की, “त्याने निवडकर्त्यांना प्रभावित करण्याची आणखी एक संधी खराब केली आहे. कानेरिया आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, सॅमसनला आणखी एक संधी मिळाली. परंतु त्याने ही संधीही खराब केली. त्याचे पुनरागमन अजिबात खास वाटत नव्हते. रोमॅरिओ शेफर्डने त्याची विकेट घेण्यापूर्वी तो खूप सुस्तावलेला दिसत होता. खरे तर सॅमसनला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला नाही पाठवले गेले पाहिजे.”
दिपक हुड्डाचा संदर्भ देत कानेरिया म्हणाला की, “हुड्डाला इतक्या खालच्या क्रमांकावर का फलंदाजीसाठी पाठवले जात आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव ठीक आहेत. परंतु हुड्डाला सॅमसनपूर्वी पाठवायला पाहिजे. भारताचे संघ व्यवस्थापन पंतप्रमाणे (Rishabh Pant) सॅमसनला वरच्या क्रमांकावर संधी देत आहे. पण सॅमसन पंत नाहीय. त्या दोघांच्या फलंदाजीत खूप अंतर आहे.”
पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी सॅमसनला संधी दिली गेली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जडेजा म्हणतोय ‘धवनला भारतीय संघात घेऊच नका’, धिम्या खेळीवरून साधला थेट निशाणा
पंड्या फॅमिलीत आला नवा चिमुकला! कृणाल बनला बापमाणूस
WIvsIND: दुुसऱ्या वनडेत कसे असेल हवामान, तर खेळपट्टीवर कोणाचे पारडे ठरणार जड; वाचा सविस्तर