भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी भारतीय चाहत्यांना 2 मोठे धक्के सहन करावे लागले. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे 2 फलंदाज केएल (KL Rahul) राहुल आणि शुबमन गिल (Shubman Gill) दुखापत झाल्याची बातमी आली होती.
आता केएल राहुलने (KL Rahul) स्वत: त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. भारतीय नियामक मंडळाने बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओद्वारे दुखापतीचे अपडेट शेअर केले आहेत.
शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रोजी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीपूर्वी प्रसिद्ध कृष्णाचा एक चेंडू केएल राहुलच्या कोपरावर लागला, त्यानंतर दुखण्यामुळे त्याने मैदान सोडले.
बीसीसीआयने (BCCI) रविवारी केएल राहुलच्या सरावाचा व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये तो आरामात फलंदाजी करताना दिसला. बीसीसीआयचे फिजिओ कमलेश जैन आणि योगेश परमार यांनी त्याच्या फिटनेसबद्दल माहिती दिली. कमलेश जैन म्हणाले, “राहुलच्या कोपरात फ्रॅक्चर किंवा हाडांशी संबंधित कोणतीही समस्या नाही.” दरम्यान, योगेश परमार म्हणाले, “आम्ही त्याचा एक्स-रे काढला आणि स्कॅन केले. हे फक्त वेदना नियंत्रित करणे आणि त्याला आत्मविश्वास देणे ही बाब असल्याचे रिपोर्टवरून स्पष्ट झाले. वैद्यकीय दृष्टिकोनातून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.”
आपल्या तंदुरूस्तीबद्दल समाधान व्यक्त करताना केएल राहुल (KL Rahul) म्हणाला, “मला चांगले वाटत आहे आणि पहिल्या कसोटीसाठी मी पूर्णपणे तयार आहे. येथे सरावासाठी लवकर आल्याचा फायदा झाला. आता मी मालिकेसाठी खूप उत्सुक आहे.”
After being hit on his elbow on Day 1 of the match simulation, KL Rahul has recovered and is raring to go 👌👌#TeamIndia | #AUSvIND | @klrahul pic.twitter.com/FhVDSNk8tv
— BCCI (@BCCI) November 17, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याला पर्याय मिळाला! हा युवा अष्टपैलू खेळाडू करणार पहिल्या कसोटीत पदार्पण
आयपीएल मेगा लिलाव लाईव्ह कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहता येणार? सर्वकाही जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारताने पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे? माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य